पुणे : भाजपचे (BJP) नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेचे (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनतर किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी दाखल झाले होते.

मात्र, महापालिका परिसरात किरीट सोमय्या यांना शिवसैनिकांनी धक्काबुकी केली आणि ते पायरीवर पडले असल्याची घटना पुण्यात घडली होती. सामना (Samna) या वृत्तपत्रातून किरीट सोमय्या यांची खिल्लीदेखील उडवण्यात आली आहे.

अॅड. असीम सरोदे (Adv. Asim Sarode) हे सामना वृत्तपत्रातून (Newspaper) किरीट सोमय्यांनी खिल्ली उडवल्यामुळे चांगलेच आक्रमक झाले आहेत. असीम सरोदे यांनी या प्रकरणाबाबत एक ट्विट केले आहे.

Advertisement

असीम सरोदे म्हणाले की, सामना या मुखपत्राने अत्यंत चुकीची, अमानुष भाषा वापरली आहे. किरीट सोमय्या यांच्या तोत्र्या बोलण्यावर आधारित ही भाषा अपंगत्वासह जगणाऱ्या लोकांचा अपमान आहे.

त्यामुळे यातील अमानवीय दर्जा लक्षात घेऊन महाराष्ट्राच्या अपंग विभाग आयुक्तांनी स्वतःहून याप्रकरणाची दखल घेऊन नोटीस जारी करावी अशा प्रकारचे ट्विट असीम सरोदे यांनी केले आहे.

किरीट सोमय्या यांना शिवसैनिकांनी पुण्यामध्ये धक्काबुकी केल्यांनतर भाजप नेते चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. भाजप नेत्यांकडून संजय राऊत आणि सामना मुखपत्रावर कडाडून टीका करण्यात येत आहे.

Advertisement