ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

‘बहुत हुई महंगाई कि मार, बस भी करो मोदी सरकार !’

केंद्र सरकारने केलेल्या इंधन दरवाढ तसेच घरगुती गॅससह इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत केलेल्या भरमसाठ दवावाढीविरोधात काँग्रेसच्या वतीने विधानसभा अध्यक्ष प्रा. शोएब शफी इनामदार यांच्या नेतृत्वाखाली सायकल रॅली काढून निषेध करण्यात आला.

हडपसर: “बहुत हुई महंगाई कि मार, बस भी करो मोदी सरकार, पेट्रोल डिझेल दरवाढ रद्द झालीच पाहिजे,” अशा घोषणा देण्यात आल्या.

जनतेच्या भावना बहि-या मोदी सरकारपर्यंत पोचविणार

जनतेच्या मनातली खदखद काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून केंद्राच्या बहिऱ्या कानांपर्यंत पोहोचवल्याशिवाय काँग्रेस कार्यकर्ता शांत बसणार नाही. असा इशारा शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी दिला.

महागाई व बेरोजगारीच्या मुद्द्यावर हडपसर येथील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत जोरदार घोषणाबाजी करत बागवे यांच्या उपस्थितीत इंधन दरवाढीविरोधात सह्यांच्या मोहिमेस सुरुवात केली आहे.

जनता धडा शिकविणार

इंधन दरवाढीने कामगार, शेतकऱ्यांसह सर्व जनतेच्या मनात आक्रोश आहे. सर्वसामान्यांचे आर्थिक कंबरडे मोडून त्यांना वेठीस धरणाऱ्या मोदी सरकारला जनता धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा बागवे यांनी दिला.

You might also like
2 li