Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

ओळखीच्या व्यक्तींकडून धमकावून लैंगिक अत्याचार

शहराच्या वेगवेगळ्या भागात अल्पवयीन मुलींसह तरुणीवर ओळखीच्या व्यक्तींनी लैंगिक अत्याचार करून त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे धक्कादायक प्रकार पुढे आले आहेत.

याप्रकरणी हडपसर, लोणी काळभोर, व कोथरूड पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. त्यापैकी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

लग्नाला नकार दिल्याने घरात घुसून लैंगिक अत्याचार

हडपसर येथे घडलेल्या घटनेत तरुणाने अल्पवयीन मुलीशी ओळख वाढवून तिला लग्नाची मागणी घातली; मात्र तिने लग्नास नकार दिल्यानंतर तिच्या घरात जाऊन लैंगिक अत्याचार केले. तसेच घडलेला प्रकार कोणाला सांगितल्यास तिच्यासह आईला मारुन टाकण्याची धमकी दिली होती.

Advertisement

दरम्यान, हा प्रकार मुलीने आईला सांगितला. त्यानंतर पीडित मुलीने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन हडपसर पोलिसांनी तेजस दत्तात्रेय निकम (वय २०, रा. गोंधळेनगर, हडपसर) यास बेड्या ठोकल्या.

१५ वर्षांच्या मुलीवर सातत्याने अत्याचार

लोणी काळभोर परिसरात घडलेल्या घटनेप्रकरणी १५ वर्षीय मुलीच्या आईने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन अक्षय पूनम राठोड (रा. कुंजीरवाडी, हवेली) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी मुलगी १५ वर्षांची असून, आरोपी तिच्या ओळखीचा आहे. होळीच्या सणाच्यावेळी त्याने मुलीवर अत्याचार केले. त्यानंतरही सातत्याने त्याने लैंगिक अत्याचार सुरूच ठेवले. या प्रकरणी पीडित मुलीने तिच्या आईला हा प्रकार सांगितल्यानंतर ही घटना उघडकीस आली.

Advertisement

तीनही प्रकरणातील मुली गरोदर

कोथरूड परिसरातही याच स्वरूपाची घटना घडली. १८ वर्षीय तरुणीला तरुणाने लग्न करण्याचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. याप्रकरणी तरुणीने कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

त्यानंतर साहिल हाळंदे (रा. सुतारदरा, कोथरूड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तिन्ही घटनांमध्ये मुली गर्भवती राहिल्यानंतर लैंगिक अत्याचाराचा प्रकार पुढे आला

 

Advertisement
Leave a comment