फोटोमार्केटने प्रोफोकसग्रीप डॉटकॉमद्वारे सहाय्य केलेला फाईड्यु एफएम ४० आणला आहे व हा डीएसएलआरज आणि स्मार्टफोन्ससाठीचा वास्तविक असा डायवर्सिटी मिनी वायरलेस मायक्रोफोन आहे व तो आता भारतामध्ये रू. ८,९९९ मध्ये उपलब्ध आहे.

हा मायक्रोफोन नॉईज- रहित व क्रिस्टल क्लीअर आणि अनकलर्ड असे ऑडिओ बनवतो व त्यामुळे तो न्युजगॅदरिंग, अँकरिंग, लाईव्ह, उच्च गुणवत्ता उत्पादने इ. सारख्या सर्व गोष्टींसाठी अतिशय योग्य आहे व त्याचे मूल्य हे वाजवी दराच्या श्रेणीमध्ये आहे. एफएम ४० ही बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या एफएम ५० आणि एफएम ६० ची अपग्रेड केलेली आवृत्ती आहे.

प्रोफोकसग्रीप डॉटकॉमद्वारे सहाय्य केलेल्या नवीन एफएम ४० हा सर्व उत्पादनांसाठी एकाच साईजमध्ये योग्य असा आहे व अमेचर्स, व्लॉगर्स, फिल्ममेकर्स ह्यांच्यासाठी तो परिपूर्ण आहे व लाईव्ह स्ट्रीमिंगसाठीही सर्वोत्तम उपयोगी आहे. ही एक अल्ट्रा कंपॅक्ट वायरलेस मायक्रोफोन सिस्टीम आहे व तिचा आकार विश्वास बसणार नाही, इतका लहान आहे व नावीन्यपूर्ण क्लिप- इन त्यामध्ये आहे व त्यामुळे तो सर्वोत्तम असा पोर्टेबल पर्याय ठरतो.

Advertisement

ह्या मायक्रोफोनमध्ये इन- बिल्ट ओम्नीडायरेक्शनल कंडेन्सर कॅपसूल आहे व तो माईकवर क्लिप ऑन म्हणून किंवा लेव्हलिअर म्हणून वापरला जाऊ शकतो व त्याद्वारे ऑन कॅमेरा किंवा स्मार्टफोन रिसिव्हरवर उच्च गुणवत्तेचे ऑडिओ व डिजिटल ट्रान्समिशनची सर्व वैविध्ये पाठवता येऊ शकतात. “वाजवी दरामध्ये गुणवत्ता देण्यामध्ये ह्या ब्रँडचा विश्वास आहे.

त्या संकल्पनेसह आणलेले आणखी एक उत्पादन एफएम ४० आहे व ते सुलभतेची वैशिष्ट्ये जपत ऑडियन्सला सर्वोत्तम सुविधा देऊन सुसज्ज करते. सौंदर्यदृष्टी, गुणवत्ता, दर आणि टिकाऊपणा ह्या बाबतीत हे उत्पादन अपेक्षांना पूर्ण उतरते. आधीच्या उत्पादनांना मिळालेल्या उत्साहवर्धक प्रतिसादानंतर आम्ही हे उत्पादन आणत आहोत,” असे फोटोमार्केटचे संस्थापक मयंक चाचरा ह्यांनी म्हंटले.

मार्केटमध्ये असलेल्या बहुतांश वायरलेस मायक्रोफोन्सच्या तुलनेत ह्या उत्पादनाचे स्थान निश्चित वरचढ असे आहे. सिग्नल्स रिसीव्ह करण्यासाठी त्यावर दोन एंटेनाजद्वारे तो सुसज्ज आहे. एंटेनाद्वारे येणा-या सिग्नल्सची तुलना केली जाते आणि दोन्हीपैकी जास्त सक्षम असा सिग्नल आउटपुटसाठी आपोआप निवडला जातो. त्यामुळे सिग्नल ड्रॉप आउट होण्याची शक्यता दूर होते.

Advertisement

नॉईज आणि फ्रीक्वेन्सी इंटरफेरन्स होऊ नये म्हणून त्यामध्ये ५७ चॅनल्स निवडीसाठी उपलब्ध आहेत. ८० मीटर/ २६५ फूट इतक्या लांब वर्केबल ट्रान्समिशन अंतरापर्यंत तो सहजपणे काम करू शकतो. शून्यापासून पूर्ण चार्ज होण्यासाठी त्याला सुमारे ४५ मिनिटे लागतात आणि पूर्ण चार्ज झाल्यावर हा मायक्रोफोन ४ तासांहून जास्त काळ चालतो. डिझाईनच्या बाबतीत त्याचे वैशिष्ट्यपूर्ण व अर्धा लपलेल्या अँटेनाचे डिझाईन शूटच्या वेळेस परिधान करण्यासाठी सुलभ आहे.