मुंबई इंडियन्सने इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) मंगळवारी झालेल्या सामन्यात पंजाब किंग्जवर सहा गडी आणि सहा चेंडू राखून विजय मिळवला. किरॉन पोलार्डची अष्टपैलू चमक (नाबाद १५ धावा आणि २ बळी) आणि हार्दिक पंडय़ा (नाबाद ४०), सौरभ तिवारी (४५) यांच्या महत्त्वपूर्ण योगदानामुळे मुंबईला हा विजय मिळवता आला.
या विजयासहीत पाच वेळा स्पर्धा जिंकणाऱ्या मुंबईच्या संघाने प्लेऑफमध्ये जाण्याच्या आशा कायम ठेवल्या आहेत. मात्र केवळ या विजयावर मुंबईला समाधान मानता येणार नाही. आता मुंबईचे तीन सामने शिल्लक असून उर्वरित तिन्ही सामने जिंकल्यानंतर त्यांचा प्लेऑफमधील प्रवेश निश्चित मानला जात आहे.
16 गुण असणाऱ्या संघाला प्लेऑफमध्ये निश्चित मानलं जातं. सध्या कोलकात्याला आपले उर्वरित सर्व म्हणजे तिन्ही सामने जिंकावे लागणार आहेत. मुंबईलाही आपले तिन्ही सामने जिंकावे लागणार आहेत
पंजाब किंग्स आणि राजस्थानला प्लेऑफ्ससाठी सामने जिंकण्याबरोबरच दुसऱ्या संघांच्या वाईट कामगिरीवर निर्भर रहावं लागणार आहे. तसेच सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागणार आहेत. तरच नेट रनरेटच्या जोरावर त्यांना अंतिम चारमध्ये प्रवेश मिळण्याची शक्यता आहे.