पुणे : गेली २ वर्षे कोरोनाच्या (Corona) महामारीमुळे पुणे आणि मुंबईच्या IPL प्रेमींना स्टेडियम मध्ये जाऊन सामने पाहायला मिळाले नाहीत. यंदाही आयपीएल (IPL) वर कोरोनाचे सावट असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

यंदा जरी आयपीएल (IPL) वर कोरोनाचे सावट असले तरी IPL प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी येत आहे. २ वर्षानंतर पहिल्यांदाच मुंबई (Mumbai) आणि पुण्याच्या (Pune) प्रेक्षकांना स्टेडियम (Stadium) मध्ये जाऊन प्रत्यक्ष सामने पाहायला मिळण्याची संधी मिळू शकते.

त्यामुळे यंदा आयपीएल सामने होताना स्टेडियम प्रेक्षकाविना मोकळे दिसणार नाहीत. पुणे आणि मुंबई मधील कोरोनाची रुग्णसंख्या (Corona Patiens) कमी झाली तर मर्यदित प्रेक्षकांना आयपीएल चे सामने पाहायला मिळू शकतात.

Advertisement

सण २०२२ चा इंडियन प्रिमियर लीगचा (Indian Premier League) सीजन मार्च महिन्याच्या शेवटी सुरु होणार आहे. तसेच मे महिन्याच्या शेवट्पर्यंत हे इंडियन प्रिमियर लीगचे सामने चालणार आहेत.

यावर्षी इंडियन प्रिमियर लीगमध्ये ८ ऐवजी १० संघ मैदानात उतरणार आहेत. लखनऊ (Lucknow) आणि अहमदाबाद (Ahmedabad) हे दोन नवीन संघ २०२२ च्या इंडियन प्रिमियर लीग मध्ये खेळताना दिसणार आहेत.

फेब्रुवारीमध्ये मेगा ऑक्शन (Mega Auction) होणार आहे. बंगळुरमध्ये १२ आणि १३ फेब्रुवारीला मेगा ऑक्शन होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यंदाच्या होणाऱ्या IPL सामन्यांसाठी २५ टक्के मर्यादित प्रवेश देण्यात येतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Advertisement