मुंबई : इंडियन प्रीमियर लीगचा (Indian Premier League 2022) 15 वा हंगामा खेळला जाणारा आहे. त्यासाठी मेगा लिलावाला (Mega auction) सुरवात होणार आहे. अशात कोणत्या खेळाडू वर सर्वाधिक बोली लागू शकते ते पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

विराट कोहलीच्या (Virat Kohli) जागी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) संघाला कर्णधार म्हणून श्रेयस अय्यरकडे देण्यात येऊ शकते.

यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघ अय्यरला मेगा लिलावात 20 कोटी रुपये मोजायला तयार होतील, असे मत आकाश चोप्रा यांनी व्यक्त केले आहे.

Advertisement

कोलकाता नाइट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या दोन संघासाठी कर्णधार पदासाठी भारतीय खेळाडूच्या शोधत आहेत.

अशात भारतीय संघातील युवा खेळाडूवर सर्वाधिक बोली लागणार असल्याचा सवाल भारतीय संघाचे माजी क्रिकेटर आणि प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्रा यांनी केला आहे.

मात्र, आयपीएलच्या मेगा लिलावात KKR व RCB या दोन संघासाठी श्रेयस अय्यरला कर्णधार पदासाठी रोमांचक सामना रंगल्याचे पाहिला मिळू शकते.

Advertisement

तसेच पंजाब किंग्सला देखील नव्या कर्णधार पदाच्या शोधात आहेत. पण पंजाब श्रेयस अय्यरसाठी मोठी रक्कम खर्च करणार नाही, असेही आकाश चोप्रा यांनी सांगितले आहे.