अमृता फडणवीसांनी (Amrita Fadnavis) मुंबईतील (Mumbai) ट्रॅफिकमुळे (Traffic) ३टक्के घटस्फोट (Divorce) होतात असे विधान केले होते. त्यानंतर या विधानावर अनेकांनी मते नोंदवली.

मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ (NCP) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी या विधानावर न बोललेलेच बरे अशी सावध प्रतिक्रिया दिली आहे.

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis ) यांच्या ट्रॅफिकमुळे घटस्फोट होतात, या विधानावर एकनाथ खडसे यांना विचारले असता त्यांनी या वक्तव्यावर न बोललेले बरे असे उत्तर दिले आहे.

Advertisement

यावेळी त्यांनी अमृता फडणवीस यांनी घटस्फोटाबाबत कुठून कसा शोध लावला कोणास ठाऊक, त्यांच्यावर प्रतिक्रिया दिली तर त्यांच्या फार तिखट प्रतिक्रिया येतात, त्यामुळे न बोललेच बरं अशा शब्दांत माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर (Shikrapur) येथे माध्यमांशी (Media) बोलताना सावध प्रतिक्रिया दिली.

दरम्यान अमृता फडणवीस म्हणाल्या होत्या की, महाराष्ट्रात वैयक्तिक कमेंट कोणावरही व्हायला नको, तसेच राजकारणातल्या महिलांवरती अनेक कमेंट केल्या जातात. परंतु ते त्यांच वैयक्तिक आयुष्य आहे, त्यावर कोणीही अजिबात कमेंट करू नये.

महाराष्ट्रातल्या राज्य सरकारला कोणतही काम जमत नसल्याचे आपण पाहतोय, मेट्रोचे काम सुध्दा तसंच पडून आहे. तसेच एसटी कर्मचा-यांचा प्रश्न, मी सामान्य माणूस म्हणून बोलत आहे.

Advertisement

जिथं गरजं आहे, तिथे राज्य सरकारने लक्ष द्यावे. भाजपा आणि आरएसएसचे (RSS) लोक महिलांचा अधिक सन्मान करतात. आज मुंबईतल्या ट्रॅफिकमुळे 3 टक्के डिव्होर्स होतात, त्यामुळं राज्य सरकारने त्याच्या चुकांकडे अधिक लक्ष घालावं असं मी सल्ला देते.