भारतीय जनता पक्षाचे नेते प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. यावर राऊत यांनी पाटील यांच्या वक्तव्याला प्रतिउत्तर दिलं आहे.

संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना म्हणाले, उत्पल पर्रीकरांना तिकीट देणं यांच्या हातात नाही. हे फक्त बोलघेवडे आहेत.

अशी टीका राऊत यांनी केली आहे. मात्र, भाजपने उत्पल पर्रीकरांना तिकीट दिल्यानंतर शिवसेनेसह सर्व पक्ष तिथे उमेदवार देणार नाहीत का?

Advertisement

असा सवाल पाटील यांनी केला होता. त्यावर राऊत म्हणाले, ते कोण सांगणार? जे बोलत आहेत, त्यांच्या हातात नाही पर्रीकरांना तिकिट द्यायचं असतं तर तेव्हाच दिलं असत.

राऊत म्हणाले, उत्पल पर्रीकर यांच भाजपने तिकीट का थांबवलं हा मोठा प्रश्न आहे. यामुळे उत्पल अपक्ष राहत असतील तर त्यांच्या विरोधात उमेदवार देऊ नये.

एवढंच आमचं म्हणणं होतं अशा एखाद्या नेत्याच्या कुटुंबातून कोणी उभे राहत असतील तर आपण उमेदवार देत नाही ही महाराष्ट्राची परंपरा आहे. तीच देखील गोव्याची आहे. यादरम्यान, गोव्यात भाजपला मनोहर पर्रीकर यांच्या नावाने ओळखले जाते.

Advertisement

अन् त्यांच्याच मुलाची लायकी काढता? त्या मतदारसंघात पर्रीकरांनी प्रतिनिधित्व केलं आहे. त्या मतदारसंघातून माफियाला तिकीट देतात त्यावर भाजपने बोललं पाहिजे असं आव्हान राऊत यांनी केल आहे.