ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

निवडणुकांबाबत सरकारला सूचना करणे घटनाबाह्य

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी अनेकदा मर्यादाभंग करतात. मुख्यमंत्र्यांना मागं पत्र पाठवून धर्मनिरपेक्षतेची त्यांनी उडविलेली खिल्ली असो, की सरकारने सूचविलेल्या विधान परिषदेवरील सदस्यांच्या नियुक्तीचा विषय; राज्यपाल भाजपच्या नेत्यासारखं वागतात.

आताही जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका पुढं ढकलण्यास सांगून त्यांनी घटनाबाह्य वर्तन केलं आहे.

राज्यपालांना अधिकारच नाही

कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रं लिहून काही सूचना केल्या आहेत. त्यावरून राजकीय टोलेबाजी सुरू झाली आहे; मात्र या पत्रातून राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना निवडणुकांबाबत काही सूचना केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

राज्यपालांना मुख्यमंत्र्यांना निवडणुकांबाबत सूचना करण्याचे अधिकार आहेत का, असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

राज्यपाल अज्ञानी

प्रसिद्ध घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी या कायदेशीरबाबीवर प्रकाश टाकला आहे. निवडणूक घेण्याचा अधिकार हा निवडणूक आयोगाचा आहे. मुख्यमंत्र्यांचा नाही. त्यामुळे राज्यपाल मुख्यमंत्र्यांना निवडणूक घेण्याबाबत सूचना करू शकत नाहीत, असं बापट यांनी सांगितलं.

भाजपनंच राज्यपालांना पत्र पाठवायला पाडलं भाग

बापट यांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरही भाष्य केलं. घटनेनुसार विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक याच अधिवेशनात होण्याची गरज आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलं.

राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना जे पत्रं लिहिलं ते भाजपनंच राज्यपालांना पाठवायला सांगितल्याची संशयाची सुई आहे, असं ते म्हणाले.

विधानपरिषदेच्या 12 जागांची नेमणूक राज्यपालांनी अद्याप केली नाही. त्यामुळं राज्यपालांचं वागणं घटनाबाह्य आहे, असं त्यांनी सांगितलं.

दोन दिवसांचा कालावधी पुरेसा

विधान मंडळाचे माजी प्रधान सचिव अनंत कळसे यांनीही विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर प्रकाश टाकला आहे. अध्यक्षाच्या निवडणुकीची तारीख मंत्रिमंडळ निश्चित करते. त्यानंतर ती तारीख राज्यपालांना कळवली जाते.

त्यानंतर राज्यपाल ही तारीख विधानमंडळाच्या प्रधान सचिवांना कळवतात. तसेच त्यांना निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश देतात. पूर्वी प्रथेप्रमाणे 7 दिवसांची नोटीस द्यावी लागायची.

कारण तेव्हा सदस्यांना पोस्टाद्वारे कळवायला लागायचं; पण आता ई-मेलद्वारे किंवा टीव्हीवरून बातम्यांद्वारे कळवता येत.

किमान एक किंवा दोन दिवसांची मुदत सदस्यांना द्यावी अशी अपेक्षा असते. दोन दिवसांचा कालावधी अध्यक्ष निवडणुकीसाठी पुरेसा आहे, असं कळसे म्हणाले.

 

You might also like
2 li