मुंबई : भाजप (BJP) नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी विरोधकांवर कडाडून टीका केली आहे. न्यायालयाचा (Court) निर्णय भाजपच्या बाजूने असतो असे म्हणत त्यांनी विरोधकांवर टीकेचे बाण सोडले आहे.
चंद्रकांत पाटील यांनी विरोधकानावर टीका करत त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. ईडी (ED) आणि सीबीआय (CBI) कारवाईवरून विरोधकांनी भाजपवर टीका केली होती त्यालाच पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
विरोधकांनी कारवायांवर केलेल्या आरोपांवर मी वारंवार हेच उत्तर देत आलोय की याचा अर्थ तुम्हाला घटना मान्य नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाची ही सर्व रचना केली.
घटना म्हणजे काय, तर काय झाल्यावर काय करावे. यात केंद्र म्हणजे काय, राज्य म्हणजे काय, सर्वोच्च न्यायालय म्हणजे काय, उच्च न्यायालय म्हणजे काय, निवडणूक आयोग म्हणजे काय, ईडी म्हणजे काय, सीबीआय म्हणजे काय, रिझर्व्ह बँक म्हणजे काय हे घटनेत आहे. असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
पुढे बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, तुम्ही रिझर्व्ह बँकेवरही बोलणार, तुम्ही सर्वोच्च न्यायालयात १२ आमदारांच्या निलंबनावरही बोलणार. त्याचा उलटा किंवा सुलटा अर्थ असा होतो की न्यायालय भाजपाच्या बाजूने निर्णय देतो.
त्यामुळे तुम्हाला न्याय मागायचा असेल तर न्यायालय आहे. तिथं जाऊन न्याय मागा. आतापर्यंत ईडी आणि सीबीआयने ज्यांच्यावर धाडी टाकल्या त्या सर्वांना जेलपर्यंत जावं लागलं. काही तुरुंगात आहेत आणि काही तुरुंगाबाहेर आहेत असेही पाटील म्हणाले आहेत.