शतपावली करण्यासाठी निघालेल्या तरुणाला दोघांनी मारहाण करून लुटले. तसेच दुचाकीवर दगड मारून नुकसान केले. सोमवारी (दि. २१) रात्री साडेबाराच्या सुमारास भोसरीतील संत तुकाराम नगर परिसरात ही घटना घडली.

भावेश रमेश सवानी (वय २२, रा. संत तुकाराम नगर) यांनी याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अभिषेक उर्फ बच्चा कांबळे (वय २०), प्रणव बाळासाहेब गवळी (वय २१, दोघे रा. भोसरी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास फिर्यादी त्यांच्या घरासमोर सार्वजनिक रस्त्यावर शतपावली करत होते. त्यावेळी फिर्यादी यांच्या ओळखीचे दोन्ही आरोपी त्यांच्यासमोर आले. त्यांनी शिवीगाळ करत फिर्यादी यांना दमदाटी केली.

Advertisement

त्यानंतर फिर्यादी यांना मारहाण करून जबरदस्तीने त्यांच्या शर्टच्या खिशातून एक हजार तीनशे रुपये काढून घेतले. तसेच रस्त्यावर पडलेले सिमेंटचे ब्लॉक फिर्यादी यांच्या गाडीवर मारुन सुमारे १२ हजार रुपयांचे नुकसान केले. भोसरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.