पोलिस कधी कोणत्या मागावरून आरोपीचा शोध घेतील, हे सांगता येत नाही. आताही हातात कोयत्यासह फोटो पोष्ट करणं एका गुन्हेगाराला चांगलंच महागात पडलं.

शहरात रावण साम्राज्य टोळीच्या नावाचा वापर करून दहशत पसरविणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

हा आहे आरोपी

स्वप्नील उर्फ युवराज सुरेश गायकवाड असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ही कारवाई गुंडा विरोधी पथकाने केली आहे.

आरोपीने फेसबुक आणि इंस्टाग्रामवर हातात कोयता घेऊन फोटो पोस्ट केला होता. अशा गुन्हेगारांवर गुंडा विरोधी पथक आणि सायबर सेलचे बारीक लक्ष आहे.

गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक हरीश माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, फेसबुक आणि इंन्स्टाग्रामवर हातात कोयता घेऊन फोटो पोस्ट करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

‘भाई’ ला पोलिसासमोर जोडावे लागले हात

तो रावण साम्राज्य टोळीच्या नावाचा वापर करून परिसरात दहशत पसरवत होता. अशी माहिती त्यांनी दिली आहे.

दरम्यान, अशा प्रकारे सोशल मीडियावर फोटो पोस्ट केल्यास महागात पडू शकते, असा इशाराही त्यांनी दिला आहे. फेसबुक आणि इंन्स्टाग्रामवर हातात कोयता घेऊन फोटो पोस्ट करणे आरोपी स्वप्नील गायकवाडला महागात पडलं आहे.

त्याच्यावर आर्म अॅक्टनुसार निगडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अक्षरशः स्वतः ला भाई म्हणावणाऱ्या स्वप्नीलला अखेर हात जोडावे लागले आहेत.