ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

एक महिन्याच्या दुराव्यानंतर जलधारा बरसणार

गेला महिनाभर दडी मारून बसलेल्या आणि शेतकरी, राज्यकर्त्यांची झोप उडविलेल्या माॅन्सूनने आता प्रसन्न होण्याचे ठरविले आहे. राग विसरून तो आनंदधारा घेऊन आला आहे.

मुसळधार पावसाचा इशारा

राज्यात मॉन्सून सक्रिय झाला आहे. 14 जुलैपर्यंत कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, मुंबई, पालघर, ठाणे, तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला.

बहुतांश भागात हजेरी, तरी काही भाग कोरडाच

राज्यात जून महिन्याचे काही दिवस आणि जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाने पूर्णपणे उघडीप दिली होती.

आता मात्र गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यात पुन्हा मॉन्सून सक्रिय झाला आहे. त्यामुळे राज्यातील बहुतांश भागांत पावसाला सुरुवात झाली आहे. असे असले, तरी काही भाग अजूनही पावसाची चातकासारखी प्रतीक्षा करतो आहे.

कोकण, मध्य महाराष्ट्रात 14 जुलैपर्यंत पावसाचा जोर राहणार आहे. याबरोबरच विदर्भातील काही भागांत तुरळक ठिकाणी पाऊस बरसणार आहे, असाही अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.

दरम्यान, मॉन्सून पुढे सरकण्यास पोषक हवामान तयार झाले आहे. त्यामुळे दिल्लीसह पंजाब हरियानाच्या काही भागांत मॉन्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

पश्चिम बंगालमध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. राज्यात पाऊस सक्रिय होण्यास हा पट्टा उपयोगी पडणार आहे.

 

You might also like
2 li