मुंबई – सध्या “हर हर महादेव’ (har har mahadev) या चित्रपटावरून चांगलेच वाद होताना दिसून येत आहे. या चित्रपटावरून मनसे आणि राष्ट्रवादी यांच्यात देखील चांगलाच वाद निर्माण झाला आहे. नुकतंच ठाण्याच्या विवियाना मॉलमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (MNS) या चित्रपटाचा (har har mahadev) मोफत शो ठेवण्यात आला होता. मात्र, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी ठाण्याच्या विवियाना मॉलमध्ये जाऊन हर हर महादेव या चित्रपटाचा शो बंद पाडला होता.

हा शो बंद पाडताना जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad Arrest) यांनी एका प्रेक्षकाला मारहाण केली, असा आरोप करण्यात आलाय. या मारहाणीप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करत त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली.

शुक्रवारी जितेंद्र आव्हाड यांना अटक (Jitendra Awhad Arrest) करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना काल वैद्यकीय चाचणीसाठीही घेऊन जाण्यात आलं होतं. मात्र, अखेर शनिवारी न्यायालयाने आव्हाडांना जामीन मंजूर केला आहे.

१५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. दरम्यान, जामीन मंजूर झाल्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी (Jitendra Awhad Arrest) प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे.

आपल्याला किमान एक दिवस तरी तुरुंगात टाकायला पाहिजे, यासाठी षडयंत्र रचलं होतं. त्यासाठी विशिष्ट कलमं लावण्यात आली होती, असा दावा जितेंद्र आव्हाडांनी (Jitendra Awhad) केला आहे.

“मला अटक करणारे वर्तकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी विनयकुमार राठोड यांचा या प्रकरणाशी शून्य संबंध आहे, असंही आव्हाडांनी म्हटलं आहे.

ते पुढे म्हणाले, “पहिल्यांदाच एक बाब स्पष्ट करू इच्छितो की, वर्तकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी विनयकुमार राठोड यांचा माझ्या अटकेशी शून्य संबंध आहे.

त्यांची हतबलत दर मिनिटाला समजत होती. त्यांच्या डोळ्यात फक्त अश्रू येणं बाकी होतं. बाकी सगळे पोलीस अधिकारी हतबल झाले होते. कारण असं अचानक कुणी कुणाला ताब्यात घेत नाही.”

“मला कलम ४१ (अ) अन्वये जी नोटीस देण्यात आली होती, ती नोटीस मला दुपारी दोन वाजता देण्यात आली होती. त्यामध्ये तुम्ही पाच वाजता चौकशीसाठी पोलीस ठाण्यात हजर राहा,

असं सांगण्यात आलं होतं. पण त्याआधीच म्हणजे अडीच वाजताच मला अटक करण्यात आली. असा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला आहे.