मुंबई : तुर्की येथील शेतकरी इज्जत कोकॅक (Izzat Kokak) यांनी गायींच्या दूधवाढीसाठी (Milk) एक वेगळा प्रयोग केला आहे. ज्यामध्ये त्यांनी जनावरांसाठी शास्त्रीय संगीत (Classical music) ऐकवण्यासाठी गायींना हेडफोन (Headphone) लावले आहेत.

तुर्की (Turki) येथील इज्जत कोकॅक या शेतकऱ्यांने 100 गायींना घेऊन दूध व्यवसाय सुरु केला आहे. एका गायीचे दिवसाला 22 लिटर दूधाचे उत्पादन आहे. असे असताना गायींनी क्लासिकल संगीत ऐकल्याने दूध उत्पादनात 5 लिटरने वाढ झाली आहे.

या शेतकऱ्याच्या म्हणण्यानुसार शास्त्रीय संगीत ऐकण्यास सुरवात केली तेव्हापासून दूध उत्पादनात ५ लिटरने वाढ झाली आहे. त्यामुळे आता गायी दिवसाला 27 लिटर दूध देत असल्याचा दावा त्याने केला आहे.

Advertisement

तसेच शास्त्रीय संगीत भावनिकदृष्ट्या हे जनावरांसाठी चांगले आहे. ज्यावेळी जनावरे मनाने प्रसंन्न असतात. त्यावेळी ते अधिकचेही दूधही देतात. एवढेच नाही तर दूधाचा दर्जाही दरम्यान सुधारला असल्याचे तरुण शेतकऱ्याने सांगितले आहे.

माझ्या गायी ह्या क्लासिकल संगीत ऐकतात. त्यामुळे त्या प्रसन्न आणि शांत असतात. त्यामुळेच दूध उत्पादनात वाढ झाली आहे. हे अवास्तव वाटत असले तरी हा माझा अनुभव असल्याचे इज्जत या शेतकऱ्याने सांगितलेले आहे.

सर्वसामान्य शेतकरी हे दूधाचे उत्पादन वाढवायचे असेल तर हिरवा चारा किंवा पेंड, कळणा या पशूंच्या खाद्यामध्ये वाढ करतो.

Advertisement

त्यामुळे दूधाच्या उत्पादनात काही प्रमाणात वाढही होईल मात्र, दुभत्या जनावराने जर (Classical Music)शास्त्रीय संगीत ऐकले अन् उत्पादनात वाढ होत असल्याचे सांगितले तर ते खरे वाटणार नाही.