पुणे : बालगंधर्व रंगमंदिर या ठिकाणी जलसंपदामंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) माध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवरून भाजपच्या (BJP) चुका सांगत राज्यात सत्ता नसल्याने आता भाजप पक्षाचा आत्मविश्‍वास कमी होत आहे,अशी टीका केली आहे.

तसेच पालिका निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीतील कॉंग्रेस(Congress), शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी (NCP) या तीन पक्षांनी एकत्र यावे. या तीनही पक्षांना एकत्रित करण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे जयंत पाटील यांनी सांगितले आहे.

यावेळी पाटील किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना झालेल्या धक्काबुक्की बद्दल देखील बोलले आहेत. ते म्हणाले की भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना पालिकेत धक्काबुक्की झाली होती. यावर सोमय्या यांनी मुख्यमंत्री यांच्या आदेशावरून हल्ला झाला होता, असे म्हटले होते.

Advertisement

परंतु सोमय्या यांना सीआयएसएफचे (CISF) संरक्षण आहे. त्यांना त्या यंत्रणेने संरक्षित केले पाहिजे होते. यात ते कमी पडले आहेत. मुख्यमंत्री त्या प्रवृत्तीचे आहेत, असे अजिबात नाही. त्याला महत्त्व देणे योग्य नाही.असे पाटील यावेळी बोलले आहेत.

त्याचसोबत माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्याविषयी विचारले असता पाटील म्हणाले, ‘चांदिवाल आयोगासमोर सचिन वाझे यांनी सांगितले होते, अनिल देशमुख यांची माझी कधी भेट झाली नाही. आता त्यांना याविषयी कोणीतरी मॅनेज करून बोलायला भाग पाडत असेल.

तसेच हिजाबवरून वाद सुरु आहे, ‘भारतीय घटनेने प्रत्येकाला अधिकार दिला आहे. कुणाचे व्यक्तिस्वातंत्र्य हिरावून घेऊ शकत नाहीत. काही ठिकाणी जे सुरू आहे, तिथे वेगळी भूमिका घेऊन मुद्दाम हा विषय तयार करणे हा प्रयत्न आहे. असे मत जयंत पाटील यांनी मांडले आहे.

Advertisement