पुणे :- कोरोनाच्या काळात उद्योगधंदे अडचणीत आहेत. कोणीही जोखीम पत्करायला तयार नाही. अशा परिस्थितीत अमेरिकेच्या अमेरिकेच्या जेबीएल कंपनीने राज्यात मोठी गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविली आहे.

पुणे जिल्ह्यातील रांजणगाव किंवा तळेगावमध्ये दोन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करून हा प्रकल्प उभा राहणार आहे.

इलेक्ट्राॅनिक्स वस्तूंची उत्पादने करणार 

जेबीएल ही कंपनी इलेक्ट्रॉनिक वस्तू निर्मिती क्षेत्रात नावाजलेली आहे. महाराष्ट्रात स्मार्टफोन, मोबाइलचे सुटे भाग, गृहोपयोगी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, अन्न व खाद्यपदार्थाची वेष्टने आदी क्षेत्रांत कंपनी आपल्या प्रकल्पाचा विस्तार करणार आहे.

Advertisement

मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती

पुणे जिल्ह्यातील रांजणगाव किंवा तळेगावमध्ये ‘जेबीएल’ आपल्या प्रकल्पाचा विस्तार करणार असून मोबाइलचे सुटे भाग आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे उत्पादन तेथे होईल. या प्रकल्पामुळे 13 हजार जणांना रोजगार मिळण्याचा अंदाज आहे.

पायाभूत सुविधा पुरवण्याची तयारी

जेबीएलला त्यांच्या पसंतीच्या ठिकाणी जमीन देण्याची महाराष्ट्राची तयारी आहे. प्रकल्प लवकर सुरू करण्यासाठी तातडीने दीड लाख लाख चौरस फूट सुसज्ज जागा देण्याची, त्यांना हवे असलेले प्रतिदिन तीस लाख लिटर पाणी, उच्चदाब वीजपुरवठा अशा सर्व सुविधा देण्याची एमआयडीसीची तयारी आहे.

तीन-चार वर्षांत आणखी गुंतवणूक

जमिनीबाबत राज्याच्या औद्योगिक धोरणानुसार विविध पर्याय त्यांना देण्यात आले असून आवडीचा पर्याय ते निवडू शकतात. सुरुवातीला 2 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असली, तरी पुढील तीन-चार वर्षांत 3 हजार कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक होईल, अशी अपेक्षा आहे.

Advertisement