मुंबई – लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री ‘जेनिफर विंगेट’ (Jennifer Winget) तिच्या अभिनयासोबतच सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. आता जेनिफर विंगेटने (Jennifer Winget) तिचे बिकिनी (Bikini) घातलेले फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिचा आनंद स्पष्ट दिसत आहे. हा असा प्रसंग होता की तिचा आनंद व्यक्त करण्यापासून ती स्वतःला रोखू शकली नाही.

जेनिफर विंगेटने नुकतंच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिची तीन छायाचित्रे शेअर केली. या फोटोंमध्ये जेनिफर विंगेट (Jennifer Winget) वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे.

जेनिफर विंगेटचे तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर 13 मिलियन फॉलोअर्सचा टप्पा पूर्ण केला आहे. या आनंदात जेनिफर विंगेटने बिकिनी घातलेले फोटो शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

जेनिफर विंगेट बिकिनी घालून समुद्रकिनारी वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे. जेनिफर विंगेटने तिच्या हाताने वाळूवर 13M लिहिले आहे. सध्या तिचे हे सोशलवर तुफान व्हायरल होत आहे.

जेनिफर विंगेटच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे तर तिने 2012 मध्ये अभिनेता करण सिंग ग्रोव्हरसोबत लग्न केले. मात्र, 2014 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.

जेनिफर विंगेटने टीव्हीशिवाय काही चित्रपटांमध्येही काम केले आहे. नुकतंच जेनिफर विंगेट (Jennifer Winget) वेब सीरिजमध्येही दिसली आहे. अगदी लहान वयातच त्यांनी करिअरला सुरुवात केली.

सोहळ मीडियावर सक्रिय असणाऱ्या या अभिनेत्रीचे इंस्टाग्रामवर लाखो फॉलोवर्स असून, फॅन्स तिच्या प्रत्येक व्हिडिओ आणि फोटोवर लाईक्सचा वर्षाव करतात.