Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

जिओची स्वदेशी ५ जी सेवा सुरू होणार

रिलायन्स उद्योग समूहाच्या सर्वसाधारण सभेत अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी जिओ फोन नेक्स्टची घोषणा केली. अँड्रॉईडवर चालणारा हा स्मार्टफोन गुगल आणि जिओ यांनी मिळून तयार केला आहे. या वर्षी दहा सप्टेंबर रोजी हा फोन उपलब्ध होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

“देशातील सर्वांत पहिली 5 जी सेवा सुरूव करण्यासाठी कंपनी तयार आहे. कंपनीनं नुकतीच मुंबईत एक जीबीपीएस ची यशस्वी चाचणी घेतली आहे. याशिवाय कंपनीला सरकारकडून चाचणीसाठी स्पेक्ट्रम आणि मंजुरीदेखील मिळाल्या आहेत,” असं अंबानी यांनी स्पष्ट केलं.

रिलायन्स झाली ग्लोबल

मुकेश अंबानी यांनी गुरूवारी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या ग्लोबल होण्याबाबत घोषणा केली. ग्लोबल प्लॅन्सबाबत येत्या काळात माहिती दिली जाणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

Advertisement

“सौदी अरामकोच्या यासिर अल रुमायन यांना रिलायन्सच्या संचालक मंडळात सामील करण्यात आलं आहे. हे कंपनीच्या ग्लोबल बनण्याची सुरूवात आहे,” असं अंबानी म्हणाले.

जगातील दुस-या क्रमांकाची कंपनी

रिलायन्स जिओबद्दल घोषणा करताना जिओ ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वांत मोठी डेटा कॅरिअर झाल्याची घोषणा मुकेश अंबानी यांनी केली. तसंच सातत्यानं याबाबत चांगलं काम होत असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

“जिओ त्वरित 5G सेवा अपग्रेड करण्याच्या स्थितीत आहे. 5G इकोसिस्टम तयार करण्यासाठी आम्ही जागतिक पातळीवरील पार्टनर्ससोबतही काम करत आहोत. जिओ केवळ भारताला टू जी मुक्त नाही, तर 5 जी युक्त बनवण्याचा प्रयत्न करत आहे,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Advertisement

धीरूभाई ग्रीन एनर्जी गीगा कॉम्प्लेक्स

अंबानी यांनी यादरम्यान कंपनीच्या ग्रीन एनर्जी प्लॅनची घोषणा केली. कंपनी जामनगरमध्ये धीरुभाई अंबानी ग्रीन एनर्जी गीगा कॉम्प्लेक्स विकसित करणार आहे.

कंपनी आता परंपरागत ऊर्जेऐवजी न्यू एनर्जी म्हणजे सोलारसारख्या ग्रीन एनर्जीवर भर देणार आहे. यासाठी रिलायन्सनं न्यू एनर्जी काऊन्सिल तयार केलं आहे. यामध्ये देशातील अनेक तज्ज्ञाना सामील करण्यात आलं आहे.

Advertisement
Leave a comment