पुणे – सध्या “हर हर महादेव’ (har har mahadev) या चित्रपटावरून चांगलेच वाद होताना दिसून येत आहे. या चित्रपटावरून मनसे आणि राष्ट्रवादी यांच्यात देखील चांगलाच वाद निर्माण झाला आहे. नुकतंच ठाण्याच्या विवियाना मॉलमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (MNS) या चित्रपटाचा (har har mahadev) मोफत शो ठेवण्यात आला होता. मात्र, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी ठाण्याच्या विवियाना मॉलमध्ये जाऊन हर हर महादेव या चित्रपटाचा शो बंद पाडला होता.

हा शो बंद पाडताना जितेंद्र आव्हाड यांनी एका प्रेक्षकाला मारहाण केली, असा आरोप करण्यात आलाय. या मारहाणीप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करत त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

काल शुक्रवारी जितेंद्र आव्हाड यांना अटक (Jitendra Awhad Arrest) करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना काल वैद्यकीय चाचणीसाठीही घेऊन जाण्यात आलं होतं.

दरम्यान, शुक्रवारची रात्र जितेंद्र आव्हाड यांना पोलीस (Vartak Nagat Police) कोठडीतच काढावी लागलेली. आता आज कोर्टात जितेंद्र आव्हाड यांना दिलासा मिळतो की शनिवार आणि रविवारची रात्रही त्यांनी कोठडीतच काढावी लागते का, हे आज ठरणार आहे.

जितेंद्र आव्हाड यांचं ट्विट…

आज दुपारी साधारण 1 वाजता मला वर्तकनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. निकम यांचा फोन आला आणि नोटीस घेण्यासाठी मी माणूस पाठवतो नाहीतर तुम्ही पोलीस स्टेशनला या असे ते म्हणाले.

मी मुंबईला जायला निघालो होतो. मी म्हटलं कि, मी पोलीस स्टेशनला येतो आणि नंतर मी मुंबईला जातो. या आशयाचं ट्विट त्यांनी (Jitendra Awhad) केलं आहे.