मुंबई – गेल्या दोन दिवसांपासून भाजपाच्या मिशन बारामतीची (baramati) राज्याच्या राजकाणात चर्चा सुरू आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी बारामती दौऱ्यादरम्यान 2024 च्या निवडणुकांमध्ये बारामतीची जागा जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला. “2024 च्या लोकसभेला महाराष्ट्रात 45 प्लस आणि विधानसभेला 200 प्लस हे सूत्र आम्ही ठरवले’ असल्याचे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी यावेळी केलं.

दरम्यान, चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या या व्यक्तव्यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.

भाजपच्या व्यक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यावर आता प्रतिक्रिया आली आहे. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी आज ट्विटरच्या माध्यमातून बावनकुळेंना प्रत्युत्तर दिलं आहे.

“बावन कुळे सोडा, लाख कुळे आली तरी शरद पवारांच्या पायाच्या नखावरची धूळसुद्धा उडणार नाही”, असं आव्हाड म्हणाले (Jitendra Awhad) आहेत. सध्या त्यांचं हे सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

चंद्रशेखर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?

“2024 ला आम्ही बारामतीसहित अनेक लोकसभा जिंकू. आतापर्यंत बारामती लोकसभा मतदारसंघात (Baramati Lok Sabha constituency) याआधी कधी फाईट झाली नाही, तशी फाईट होईल.

भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकत्र लढून बारामती लोकसभा (Baramati Lok Sabha constituency) जिंकणार म्हणजे जिंकणारच’ असा विश्वास बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी व्यक्त केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विश्व गुरू आहेत. 155 देशांनी त्यांचं नेतृत्व स्वीकारलं आहे. बाकी लोकांना पॉलिटिकल व्हिजन आहे. पंरतू, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विकासाचे व्हिजन घेऊन चालले असल्याचे बावनकुळे म्हणाले.