27 जानेवारी 2022 पासून भारतीय नौदलात स्पेशल नेव्हल ओरिएंटेशन कोर्ससाठी SSC (शॉर्ट सर्व्हिस कमिशन) या पन्नास जागांसाठी भरती निघाली आहे.
तसेच या अर्जाची शेवटची तारीख १० फेब्रुवारी आहे. यामध्ये नौदल पद- माहिती तंत्रज्ञानासाठी एसएससी अधिकारी (कार्यकारी शाखा), रिक्त पदांची संख्या – 50, नौदल भरती 2022 साठी वेतन उपलब्ध असेल.
एसएससी ऑफिसरच्या पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना ग्रेड लेव्हल 10 अंतर्गत 56,100 ते 1,10,700 रुपये वेतन मिळेल. यातील संबंधित उमेदवार joinindiannavy.gov.in या वेबसाइटवर जाऊन माहिती मिळवू शकतात.
या भरतीतील तरुणांना आयटीमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर या संधीचा फायदा घ्यावा. आणि या वेबसाईट वरून डॉक्युमेंट जोडून फॉर्म व फी भरून डाउनलोड करून त्याची प्रिंट घ्यावी.
नौदल भरती 2022 साठी ही शैक्षणिक पात्रता उमेदवारांनी किमान ६०% गुणांसह संगणक विज्ञान आणि संगणक अभियांत्रिकीमध्ये BE, B.Tech पदवी असणे आवश्यक आहे.
याशिवाय, संगणक आणि आयटीमध्ये एमएससी पदवी आणि संगणक विज्ञान आणि आयटीमध्ये एमसीए किंवा एमटेक पदवी असणे आवश्यक आहे.
अर्ज करणाऱ्या उमेदवारांचा जन्म 2 जुलै 1997 ते 01 जानेवारी 2003 दरम्यान झालेला असावा. तसेच नौदल भरतीची निवड प्रक्रिया सेवा निवड मंडळ (SSB) मुलाखतीवर आधारित असेल.