पुणे – जंक फूड (Junk Food) खाणे कोणत्याही वयोगटातील व्यक्तीसाठी योग्य नाही, परंतु जर तुम्ही ते खात असाल तर हे अन्न खाल्ल्यानंतर काही गोष्टी नक्कीच खाव्यात, जेणेकरून तुमच्या शरीराला कमीत कमी हानी पोहोचेल. जंक फूड (Junk Food) मुळे लठ्ठपणापासून कोलेस्ट्रॉल (Cholesterol) आणि बीपीपर्यंतच्या समस्या येतात. याशिवाय पोटाशी संबंधित समस्याही वाढतात. पचन व्यवस्थित नसल्यामुळे मुरुम आणि त्वचेच्या समस्यांनाही सामोरे जावे लागते. या जंक फूडपासून (Junk Food) दूर राहिल्यास बरे होईल. तरीही खाल्ल्याशिवाय राहता येत नसेल, तर खाल्ल्यानंतर काही गोष्टी अवश्य घ्या; ज्यामुळे जंक फूडमधील (Junk Food) विषारी घटक तुमच्या शरीरातून बाहेर पडतात.

ग्रीन टी वजन कमी करणे

दिवसातून कमीत कमी तीन कप ग्रीन टी प्या. यामुळे तुमच्या शरीरात साठलेली चरबी वितळू लागते आणि त्यामुळे तुमचा लठ्ठपणाही कमी होऊ लागतो. जंक फूड खाल्ल्यानंतर ग्रीन टी प्यायल्यास त्याचे नुकसान कमी होते.

शरीर हायड्रेटेड ठेवा

दिवसभरात किमान तीन लिटर पाणी प्यावे. कारण पाण्यामधूनच तुमच्या शरीरातील तेल आणि मीठ बाहेर पडतं. त्यामुळे नारळ पाणी, ताक, दही भरपूर खा.

लिंबूवर्गीय फळे खा

जंक फूड खाल्ल्यानंतर लिंबाचे कोमट पाणी प्यावे. याशिवाय, तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही संत्री, नाशपाती किंवा बेरीसारखे कोणतेही लिंबूवर्गीय फळ खाऊ शकता. या फळांचे सेवन करून तुम्ही जंक फूडचे हानिकारक प्रभाव कमी करू शकता.

ओमेगा 3 फॅटी ऍसिडस्

ओमेगा थ्री फॅटी अॅसिड भरपूर असलेल्या अशा गोष्टी तुम्ही खाव्यात. यासाठी तुम्हाला त्यांच्या नैसर्गिक स्रोताविषयीही माहिती असायला हवी. तुम्ही अंडी, फ्लेक्ससीड, अक्रोड आणि सोयाबीनचे सेवन करू शकता.