जुन्नर – स्त्यावर चालताना किंवा प्रवास करताना मृत्यू कधी, कुठे आणि कोणाला गाठेल हे कोणीही सांगू शकत नाही. अनेकदा रस्ते अपघाताचे असे व्हिडिओ समोर येतात, ज्यामध्ये क्षणात होत्याच नव्हतं झाल्याचं पाहायला मिळतं. सध्या जुन्नर (Junnar) परिसरातील अशाच एका अपघाताचा (accident) व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचं पाहायला मिळत आहे.

या घटनेत जुन्नर तालुक्यातील पारगाव मंगरुळ येथील एक महिला आणि तिच्या सोबत असलेल्या चिमुरड्याचा अपघातात (accident) झाला आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये (cctv video) कैद झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जुन्नर तालुक्यातील पारगाव मंगरुळ येथील मंगरुळ चौकात सुसाट वेगाने प्रवास करणाऱ्या कारने रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक (accident) दिली आहे.

या अपघातात दुचाकीवरील मागे बसलेली महिला आणि तिच्या सोबत असलेलं छोटं बाळ चेंडू सारखे उडून खाली पडले. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे. मात्र, हे दोघे जखमी झाले आहेत.

दरम्यान, हृदयात धडकी भरणारी ही दृश्य पाहून अनेकांनी या रस्त्याच्या अपूर्ण कामाच्या बाबत नाराजी व्यक्त केली आहे. पारगाव येथील मंगरुळ चौकात रस्ता दुभाजक नाही यामुळे हा अपघात घडला आहे. असं नागरिक म्हणत आहेत.

ही धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून, हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. अनेकांनी ही दृश्य पाहून रोष व्यक्त केला आहे.

तसेच, ग्रामस्थांकडून गतिरोधक बसवण्याची सतत मागणी होऊनही प्रशासन दुर्लक्ष करत असून एखादा मोठा अपघात झाल्यावरच प्रशासन जागे होणार का? असा प्रश्न स्थानिक ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.