पुणे : गेल्या काही दिवसांपासून कालिचरण महाराज (Kalicharan Maharaj) वादाच्या भोवऱ्यात अडकलेले पहिला मिळत आहे. कालिचरण महाराजाला पुणे पोलिसांनी (Pune Police) रायपूरमधून (Raipur)ताब्यात घेण्यात आले आहे.

महात्मा गांधींबद्दल (Mahatma Gandhi) गलिच्छ भाषा वापरणाऱ्या कालिचरण महाराजाला अखेर पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

कालिचरण महाराज यांच्याविरोधात पुण्याच्या खडक पोलीस ठाण्यात (Khadak Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

रायपूर पोलिसांनी (Raipur Police) कालिचरण महाराजाला पुणे पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. त्यांना दुपारी पुण्यामध्ये आणले जाणार आहे. त्यांनतर त्यांची पुणे पोलिसांकडून चौकशी (Police inquiries) केली जाणार आहे.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे मारेकरी नथुराम गोडसे (Nathuram Godase) यांचे समर्थन केले होते. तसेच महात्मा गांधी यांच्याबद्दल बोलताना अर्वाच्च भाषा वापरल्यामुळे पुण्यामध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कालिचरण महाराज यांच्यावर चिथावणीखोर आणि दोन समजत वाद निर्माण होतील असे भाषण केल्यामुळे खडक पोलीस ठाण्यात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

कालिचरण महाराजांचा चिथावणीखोर भाषण केलेला व्हिडीओ (Video) समोर आल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

महात्मा गांधींविषयी त्यांनी अपशब्द वापरले आणि नथुराम गोडसे यांचे कौतुक केल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे.

Advertisement