पुणे : महात्मा गांधीविविषयी (Mahatma Gandhi) अर्वाच्च भाषेत बोलणाऱ्या आणि नथुराम गोडसेचे (Nathuram Godase) कौतुक करणाऱ्या कालिचरण महाराजाला (Kalicharan Maharaj) काल पुणे पोलिसांनी (Pune Police) रायपूर (Raipur) मधून ताब्यात घेतले आहे.

कालिचरण महाराजाला कालच पुणे (pune) येथे आणण्यात आले आहे. त्याला पुणे सत्र न्यायालयात (Pune Sessions Court) हजार केले असता सत्र न्यायालयाने त्याला १ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

कालिचरण महाराज यांच्याविरोधात धार्मिक भावना (Religious sentiment) भडकावल्यामुळे आणि चिथावणीखोर भाषण केल्यामुळे त्याच्यावर खडक पोलीस ठाणे पुणे (Khadak Police Station) येथे गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

पोलिसांनी न्यायालयात कालिचरण महाराज यांची चौकशी करण्यासाठी पोलीस कोठडी (Police cell) मागितली आहे. या प्रकरणातील इत्तर आरोपी फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस कोठडी मागण्यात आली आहे.

या प्रकरणातील मिलिंद एकबोटे, रमाकांत एकबोटे, दिपक नागपुरे, मोहन शेटे आणि कॅप्टन दिगेंद्र कुमार हे आरोपी फरार आहेत. त्याचबरोबर कालिचरण महाराजांचे व्हॉईस सॅम्पल घ्यायचे आहेत.

या इतर आरोपींसोबत मिळून कालिचरण महाराजाचा दंगल भडकावण्याचा प्रयत्न होता का ? याची सर्व चौकशी पोलिसांना करायची असल्याचे सत्र न्यायालयात पोलिसांनी सांगितले.

Advertisement