नवी दिल्ली : कर्नाटक (Karnataka) राज्यातील हिजाब (Hijab) वादाचे पडसाद अख्या देशातच नाही तर दुसऱ्या देशातही जाऊन पोहोचले आहे. या प्रकरणावरून वेगवेगळ्या पातळीतून टीका होताना दिसत आहे. अभिनेत्री कंगना रणौतने (Kangana Ranaut) देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे.
कर्नाटक राज्यात शाळेत (School) हिजाब घालण्यास बंदी घालण्यात आल्यानंतर दुसऱ्या राज्यातही त्याचे पडसाद उमटले असल्याचे पहिले आहे. कंगना रणौतने कोणत्याही धर्माची बाजू न घेतल्याचे दिसत आहे.
कंगना रणौतने पोस्ट करत म्हणाली होती तुमच्यात हिम्मत असेल तर अफगाणिस्तानमध्ये बुरखा घालून दाखवा. त्यावर शबाना आझमी (Shabana Azami) यांनी पलटवार केला होता.
अफगाणिस्तान (Afganisthan) आणि भारतामध्ये (India) फरक आहे हे कंगनाला माहीत नाही का? असा विचारला होता.
मुलांच्या शिक्षणासाठी हिजाबपेक्षा पुस्तक महत्त्वाची आहेत. शाळेत जय माता दीचा दुपट्टा किंवा बुरखा यापैकी काहीही घालू शकत नाही.
आपल्या गणवेशाचा आदर करणे महत्त्वाचे आहे. शाळांमध्ये कोणत्याही धार्मिक चिन्हाचा किंवा वस्तूचा प्रचार करू नये असे कंगना म्हणाली आहे.
पुढे कंगना म्हणाली, निवडणुक आल्यामुळे बुरखा विषयी हे सगळं नाटक सुरु आहे आणि त्याचा परिणाम होतो हे तुम्हाला माहित आहे. सध्या काश्मीरमधील एक टॉपर मुलगी आहे.
त्या मुलीला जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. तिचे जीवन नरक बनले आहे. तू बुरखा का घालत नाहीस असं म्हणतं लोक तिच्या पाठी लागले आहेत. शाळेत जाणार्या बहुतेक मुलांना हे सोयीचे नसते आणि ही त्यांची निवड असते.
मुलींना बुरखा घातला नाही तर त्यांच्यावर बलात्कार होतो असं सांगितल्यामुळे त्यांच्या अभ्यासावर परिणाम होतं आहे. अशा गोष्टी करून तुम्ही फक्त मुस्लिम मुलींच नाही तर हिंदू मुलींचं आणि सगळ्यांचं आयुष्य उध्वस्त करत आहात. असेही कंगना म्हणाली आहे.