मुंबई : अभिनेत्री ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) हिने घेतलेल्या एका मुलाखतीत  (Interview) करिना कपूर-खान (Kareena Kapoor Khan) ला वैयक्तिक आयुष्याबद्दल विचारण्यात आले होते. त्यावेळी करीनाने याबाबतचे चांगले वाईट अनुभव सांगितले आहेत.

करिना कपूरचं काम, वैयक्तिक आयुष्य, ब्रेकअप (Breakup) सैफ अली खानसोबत (Saif Ali Khan) लग्न, तसेच तिचा मुलगा तैमूर (Taimur) या सगळ्या गोष्टींवर नेटकरी लक्ष ठेवून असतात.

त्यामुळे साहजिकच व्यक्तिगत आयुष्यात काही चुका झाल्या तर सोशल मीडियावर (Social Media) अनेकांच्या चर्चेचा विषय बनत असतो.

Advertisement

परंतु हा सर्व प्रकार त्यांच्या मागे चालू असतो. त्यामुळे करिनाला स्वत:ला या सगळ्याबाबत काय वाटते? याबाबतचे वाईट अनुभव तिने सांगितले आहेत.

या मुलाखतीत करीनाने ‘माझं वैयक्तिक आयुष्य, माझे करिअर या सगळ्या गोष्टींवर लोक विनाकारण चर्चा करतात. आधी मला या सगळ्याचा खूप त्रास व्हायचा. मात्र आता मी या सगळ्या गोष्टींकडे मी दुर्लक्ष करते.

माझे करिअर, मी नाकारलेला सिनेमा (Film) याबाबतही बोललं गेलं. एकेकाळी माझे ब्रेकअप हा नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय होता. त्यानंतर मी सैफसोबत लग्न केले. आमचे लग्नही टीव्ही चॅनेलच्या हेडलाईनमध्ये होते. असे सांगितले आहे.

Advertisement

तसेच संजय लीला भन्साळी (Sanjay leela Bhansali) यांचा एक सिनेमा मी नाकारला होता. त्यावेळी माझी खूप चर्चा झाली होती .

अनेकांनी मला यामुळे ट्रोल केले होते. मी संजय लीला भन्साळी यांचा चित्रपट नाकारला तर ही गोष्ट एक वर्षभर चर्चेचा विषय बनली होती. असेही करीनाने मुलाखतीत सांगितले आहे.

Advertisement