ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

जयंत पाटील यांची सूचना कर्नाटकला मान्य

बंगळूर: अलमपट्टी धरणाच्या फुगवट्याचे पाणी कृष्णा, कोयनेसह अन्य नद्यांना येणारे पूर, त्यात जादा पाणी सोडण्याबाबत कर्नाटकचे आडमुठे धोरण यामुळे सांगलीसह अन्य भागांना कायम महापुराचा धोका सहन करावा लागतो.

दरवर्षी कोट्यवधी रुपयांचं नुकसान होतं. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केलेल्या महत्त्वाच्या सूचना कर्नाटक सरकारने मान्य केल्या आहेत.

रिअर टाईम डाटा यंत्रणा बसविण्याची सूचना :- पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी महाराष्ट्राप्रमाणे कर्नाटक राज्याची पाण्याची आवक-जावक, पाणीसाठा याबाबतची अलमटीवर डायनॅमिकल कंट्रोलसाठी आधुनिक रियल टाईम डाटा यंत्रणा बसवावी, अशी पाटील बंगळूरमध्ये झालेल्या बैठकीत केली.

ती त्यांनी मान्य केल्याची माहिती मंत्री पाटील यांनी तातडीनं ‘सोशल मीडिया’वर जाहीर केली. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा यांच्यात बंगळूरमध्ये सकाळी बैठक झाली. या बैठकीस दोन्ही राज्यांचे मुख्य सचिव व जलसंपदा पाटबंधारे अधिकारी उपस्थित आहेत.

पूरस्थिती टाळण्यावर भर :- मुख्यमंत्र्यांच्या बंगळूर येथील निवासस्थानी ही बैठक झाली. सातारा, सांगली भागात महापुराची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून पाटील यांच्या पुढाकाराने बैठक झाली. गेल्या वर्षी राज्याच्या जलसंपदा विभागाने पाण्याचे सुव्यवस्थित नियोजन करून पूर परिस्थिती टाळली होती.

समन्वयाने पूर परिस्थितीवर मात करणार :- पाटील यांनी सांगितले, की दोन्ही राज्यांनी येत्या पावसाळ्यात समन्वयाने पूर परस्थितीवर मात करण्याचे ठरले. राज्यात डायनॅमिक पद्धतीने रियल टाईम डाटा यंत्रणा उपलब्ध आहे.

त्याप्रमाणे कर्नाटक राज्यानेही डायनॅमिक पध्दतीने रियल टाईम डाटा यंत्रणा बसवण्याची सूचना केली. त्यास कर्नाटकने सहमती दर्शवली आहे. यामुळे अलमट्टी धरणातील आवक-जावक यांची माहिती तातडीने दोन्ही राज्यांना मिळेल. अलमट्टीपुढील नारायणपूर येथील बंधाऱ्यापर्यंत पुराच्या पाण्यांचेही नियंत्रण करणे शक्य होणार आहे.

You might also like
2 li