कोल्हापूर : करुणा शर्मा (Karuna Sharma) यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर आरोप केले होते. त्यामुळे राज्यात खळबळ उडाली होती. आता पुन्हा एकदा करुणा शर्मा यांनी धनंजय मुडेंबद्दल वक्तव्य केले आहे.

करुणा शर्मा यांनी निवडणूक (Election) लढवणार असल्याचे काही दिवसांपूर्वीच घोषित केले आहे. त्यांनी पक्षाचे नावही जाहीर केले आहे. शिवशक्ती (Shivshakti)असे त्यांच्या पक्षाचे नाव आहे.

कोल्हापूरमध्ये (Kolhapur) बोलताना करुणा शर्मा यांनी कोल्हापूर उत्तर मतदार संघाची पोटनिवडणूक लढणवार असल्याचे सांगितले आहे.

Advertisement

लोकसभा, विधानसभा ते नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पोटनिवडणुका अशा सर्व प्रकारच्या निवडणुकांमध्ये पक्षाचे उमेदवार असतील असेही करुणा शर्मांनी स्पष्ट केले आहे.

अपेक्षित उमेदवार न मिळाल्यास स्वत: निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असे सांगतानाच त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावरही टीका केली आहे. तसेच संजय राठोड यांच्याबद्दलही वक्तव्य केले आहे.

करुणा शर्मा म्हणाल्या की, जिथे जिथे पोटनिवडणूक असेल तिथे आमच्या पक्षाचा उमेदवार उभा करु. कोल्हापूरमध्ये दोन-तीन लोकांशी आमचे बोलणे सुरु असून यामध्ये उत्तम कागले,

Advertisement

अजय देढे या सामाजिक कार्यकर्त्यांबरोबरच इतर दोन जण राजकीय व्यक्तींचा समावेश आहे. त्यांच्या नावाची घोषणा नंतर करण्यात येईल, असेही करुणा शर्मा यांनी सांगितले आहे.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या, शक्ती कायदा हा केवळ दिखावा आहे. जर शक्ती कायद्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किंवा महाराष्ट्र सरकारने जर काही केलं असतं तर सर्वात आधी धनंजय मुंडेंना तुरुंगात टाकले असते.

त्यानंतर संजय राठोड (Sanjay Rathod) यांना तुरुंगात टाकले असते. पण या लोकांवर साधा एफआयआर देखील पोलिसांनी दाखल केलेला नाही, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली आहे.

Advertisement