पुणे – पुण्यातील कात्रज परिसरात एक धक्कादायक घटना घडली असून, यामुळे संपूर्ण कात्रज परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कात्रज येथील नानासाहेब पेशवे तलावात म्हणजेच, कात्रज तलावात (Katraj Lake) आज दुपारी १२ वाजताच्या सुमारास एका अनोळखी पुरुषचा मृतदेह (Pune Crime) तलावाच्या पाण्यावर तरंगत असल्याचे दिसून आले आहे. सुरक्षा रक्षक शेखर दिघे यांना तलावात हा मृतदेह दिसून आला होता.

दरम्यान, नजीकच्या काळात कात्रज (Katraj Lake) तलावात व्यक्तीचा मृत्यू होण्याची ही तिसरी घटना असल्याने नागरिकांतून चिंता व्यक्त होत आहे. काही दिवसांपूर्वी एका अज्ञात महिलेचा मृतदेह तलावात आढळा होता.

मृतदेह आढळून आल्यानंतर सुरक्षा रक्षक शेखर दिघे यांनी ११२ या क्रमांकावर संपर्क केला असता, कात्रज मार्शल पोलीस नाईक संतोष कदम, हवालदार राजेश गोसावी घटनास्थळी पोहचले.

पोलिसांनी अग्निशामक दल यांना कळविले मृतदेह बाहेर काढला. मात्र कोणताही पुरावा नसल्याने ओळख पटू शकली नाही. घटनेची माहिती मिळताच.

विजय पुराणिक, पोलीस उपनिरीक्षक अतुल थोरात यांनी भेट देऊन पाहणी केली. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह ससून रुग्णालयात पाठविण्यात आला असून पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत.

महिनाभरातील तिसरी घटना….

ऐन दिवाळीच्या काळात या तलावात सकाळच्या सुमारास एका महिलेचा मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे दिसून आले आहे. अग्निशामक दलाच्या जवानांनी मृतदेह बाहेर काढण्यात आला होता.

भारती विद्यापीठ पोलिसांकडून महिलेची ओळख पटविण्यात आली होती. सुरक्षा रक्षकाडून याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला देण्यात आली होती.

पोलीस प्रशासन तसेच अग्निशमन दलाला माहिती मिळताच घटनास्थळावर दाखल आणि पाच जवानांकडून महिलेचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला.