ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

‘केजीएफ’ स्टार यश फिल्म इंडस्ट्रीच्या ३००० कामगारांना करणार मदत, खात्यावर पाठवणार ‘एवढे’ रुपये

‘केजीएफ’ चित्रपटाचा ‘रॉकी भाई’ सुपरस्टार यशला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. त्याचा अभिनय आणि शैलीने कोट्यवधी चाहत्यांना भुरळ पडली आहे. याशिवाय यश आपल्या उदारपणासाठीही ओळखला जातो.

यश त्याच्या चाहत्यांची आणि खासगी कलाकारांची खास काळजी घेतो , तसेच तो चित्रपटसृष्टीतील इतर लोकांचा खूप आदर करतो. आता बातमी येत आहे, कन्नड चित्रपटसृष्टीतील कामगारांना मदत करण्याचा यशने मोठा निर्णय घेतला आहे.

कोरोना साथीच्या आजारामुळे चित्रपटसृष्टीतले काम बंद आहे, अशा परिस्थितीत तेथे काम करणाऱ्या दैनंदिन कामगारांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. हे लक्षात घेता सुपरस्टार यशने कन्नड फिल्म इंडस्ट्रीतील 3000 हजाराहून अधिक कामगारांना मदतीचा हात दिला आहे. निवेदन देताना मदत कशी पोहोचेल याबद्दल त्यांनी सांगितले आहे.

यशने आपल्या ट्विटरवर पोस्ट शेअर करताना लिहिले की, ‘कोविड १९ हा एक अदृश्य शत्रू आहे ज्याने देशातील बर्‍याच लोकांचे जीवनमान उधळले आहे. कोविड दरम्यान माझी कन्नड फिल्म इंडस्ट्री खूप कठीण अवस्थेतून जात आहे.

अशा वेळी मी ठरवलं आहे की मी आमच्या चित्रपटसृष्टीतील 21 विभागांतील तीन हजाराहून अधिक कर्मचार्‍यांना माझ्या कमावलेल्या पैशांपैकी पाच हजार रुपये थेट त्यांच्या खात्यात पाठवतो.

मला माहित आहे की या कठीण काळात तुम्हा लोकांचे जे नुकसान झाले आहे ते ह्यातून भरून निघणार आहे परंतु हा एक आशेचा किरण आहे, आशा आहे की आपल्या सर्वांची लवकरच चांगली वेळ सुरु होईल.

यश लवकरच ‘केजीएफ चॅप्टर 2’ चित्रपटात दिसणार आहे. त्याचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शक प्रशांत नील यांनी जाहीर केले आहे की हा चित्रपट 16 जुलै रोजी चित्रपटगृहात दाखल होईल. केजीएफ चॅप्टर 2 मध्ये संजय दत्त मुख्य खलनायकाच्या भूमिकेत असणार आहे. हा चित्रपट तेलगू, तामिळ, मल्याळम आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित होईल.

You might also like
2 li