ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

खडसे यांची नऊ तास चौकशी

भोसरी एमआयडीसीतील जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीसमोर हजर झालेल्या एकनाथ खडसे यांची तब्बल नऊ तास चाैकशी करण्यात आली. चौकशीनंतर त्यांनी माध्यमांशी बोलणं टाळलं.

ईडीला हव्या तितक्या वेळा चौकशीला हजर राहणार

चौकशी झाल्यावर ईडी कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर थेट आपल्या गाडीत बसून रवाना झाले. त्यांच्या वकिलांनी माध्यमांना या चौकशीची माहिती दिली.

या वेळी वकिलांनी ईडी चौकशीसाठी जितक्या वेळा बोलावेल, तितक्या वेळा आम्ही हजर राहू असं सांगितलं. त्यामुळे ईडीकडून अटक टाळण्यासाठी खडसे यांनी हवं तेव्हा हजर राहण्याचं आश्वासन दिलं का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

संपत्तीची चौकशी

खडसे यांचे वकील म्हणाले, “ईडीच्या कार्यालयात चौकशी झालीय. चौकशीच आम्ही सर्व प्रकारचं सहकार्य दिलं. या चौकशीत संपत्तीची संपूर्ण चौकशी करण्यात आली.

ईडीने स्टेटमेंट्सची सत्यता तपासली. याशिवाय ईडीला जी कागदपत्रे हवी होती ती सगळी दिली. ईडीला आणखी काही कागदपत्रे हवी होती, ती कागदपत्रे दहा दिवसांत जमा करण्यास सांगितलं आहे.

ईडीने पैशांच्या व्यवहाराबाबत, तसंच भोसरीतील जमिनीबाबतही चौकशी केली. खडसे यांनी सविस्तर माहिती दिली आहे.”

चौकशीला जाण्यापूर्वी भाजपवर टीका

ईडीने चौकशीला बोलावल्यानंतर खडसे ईडी कार्यालयात हजर झाले. त्या वेळी या कारवाईमागे राजकीय सुडाचा वास येतोय. मी पक्ष बदलला. भाजपसोडून राष्ट्रवादीत आलो. त्यानंतर माझ्या चौकश्या सुरू झाल्या.

राजकीय हेतूने ही कारवाई सुरू आहे. नाथाभाऊंना छळण्यासाठीचं हे षडयंत्र सुरू आहे, असं सांगतानाच जळगावमध्ये व्हॉट्सअॅपवर भाजप कार्यकर्त्यांच्या ग्रुपवर अभी कुछ होनेवाला है असा मेसेज फिरत आहे.

यातून हे सर्व राजकीय हेतूने प्रेरित असल्याचं दिसून येत आहे; पण मी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे, असं खडसे म्हणाले होते.

अजून किती चौकशा करणार?

“ही जमीन एमआयडीसीची नाही. ती खासगी जमीन आहे. एमआयडीसीने हा भूखंड संपादित केलेला नाही. त्याचा मोबदला दिलेला नाही. ताबाही दिलेला नाही.

आम्ही सर्व खासगी व्यवहार केले आहेत. मी भूखंड खरेदी केला, तेव्हा त्यावर मूळ मालकाचं नाव होतं. हे मी वारंवार सांगितलं आहे. या प्रकरणी पाच वेळा चौकशी झाली.

अँटी करप्शन ब्यूरोनेही चौकशी केली. आरोपात काही तथ्य नसल्याचा अहवालही त्यांनी दिला आहे. अजून किती वेळा चौकशी करणार आहात?” असा सवाल त्यांनी केला.

 

You might also like
2 li