ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

ईडीची नोटीस आल्यानंतर खडसे यांच्या तब्येतीत बिघाड

ईडीच्या कारवाईने भल्याभल्यांची भंबेरी उडते. काही लोक अटक टाळण्यासाठी अपील करतात. काही लोकांना कोरोना होतो, तर काही लोकांच्या छातीत धस्स होतं.

ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या जावयाला अटक करण्यात आल्यानंतर त्यांनाही नोटीस बजावण्यात आली. त्यामुळे त्यांची तब्येत बिघडली आहे.

खडसेंची पत्रकार परिषद रद्द

पुण्याच्या भोसरी येथील जमीन घोटाळा प्रकरणी खडसे अडचणीत सापडलेले आहेत. जावयाच्या अटकेनंतर त्यांनाही ईडीने समन्स बजावलं आहे. याच पार्श्वभूमीवर आज त्यांची पत्रकार परिषद होणार होती.

आजच्या पत्रकार परिषदेत खडसे मोठा गौप्यस्फोट करणार, अशी चर्चा होती; मात्र त्याअगोदरच त्यांची प्रकृती ढासळली आहे. त्यामुळे आज होणारी पत्रकार परिषद रद्द करण्यात आली आहे.

ईडीचे समन्स

भोसरी येथील जमीन घोटाळा प्रकरणी खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना परवा मध्यरात्री अटक करण्यात आली. त्यांची कसून चौकशी केल्यानंतर ईडीने त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. यानंतर खडसे यांच्या अडचणीत वाढ झाली.

तसंच खडसे यांनादेखील अटक होऊ शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येऊ लागली. जावयाच्या अटकेनंतर काही तास उलटत नाहीत तोपर्यंतच खडसेयांना देखील ईडीने समन्स बजावले.

ईडीपुढे हजर राहणार का?

आज सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश त्यांना समन्सच्या माध्यमातून देण्यात आले. तत्पूर्वी ईडी कार्यालयातल्या हजेरीअगोदर खडसे पत्रकार परिषद घेणार होते.

या पत्रकार परिषदेत ते काहीतरी मोठा गौप्यस्फोट करणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात चर्चा होती; परंतु त्या अगोदरच प्रकृती अस्वास्थ्यामुळे आज होणारी पत्रकार परिषद खडसे यांना रद्द करावी लागलेली आहे.

 

You might also like
2 li