जळगावः भारतीय जनता पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेल्या एकनाथ खडसे यांच्यामागील ईडीचे शुक्लकाष्ठ काही संपायला तयार नाही.

भोसरी येथील एमआयडीसीतील जमीन खरेदी प्रकरणात खडसे यांचे जावई गिरीश चाैधरी यांना ईडीने अटक केली आहे.

फास आवळला जातोय

खडसे यांच्या पत्नी मंदाताई खडसे, जावई गिरीश चौधरी यांच्या नावाने भोसरी येथे एमआयडीसीची जागा खरेदी केल्याचे प्रकरण गाजले होते.

Advertisement

या प्रकरणी खडसे यांनी मंत्रिपदाचा गैरवापर करून कमी किंमतीत ही जागा खरेदी केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता. तसेच या प्रकरणी झोटींग समिती नेमण्यात आली होती. त्यामुळे खडसे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

तसेच त्यानंतर खडसे यांची ईडीकडून चौकशी सुरू झाली. आता त्यांचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीने अटक केल्याने खडसे यांच्या भोवती ईडीचा फास आवळला जात आहे.

सीडी कधी लावणार?

खडसे यांना मंक्षिपदाचा राजीनामा द्यावा लागल्यानंतर त्यांचे अनेकदा भाजप नेत्यांसोबत खटके उडाले. त्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह काही नेत्यांवर त्यांनी गंभीर आरोप केले.

Advertisement

त्यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतांना तुम्ही ईडी लावल्यास आम्ही सीडी लावू असा इशारा दिला होता.

त्यामुळे आता खडसे काय करतील, खरंच ते आता सीडी लावतील का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Advertisement