१७ व १८ डिसेंबर रोजी १३ क्रीडा प्रकारांचे आयोजन , ३० वर्षापुढील खेळाडूंसाठी पर्वणी अहमदनगर : कोकमठाण येथील आत्मामलिक क्रीडासंकुलात दि . १७ व १८ डिसेंबर रोजी ३० वर्षापुढील खेळाडूंसाठी राज्यस्तरीय खेलो मास्टर्स स्पर्धेचे आयोजन केले असल्याची माहीती खेलो मास्टर्स असोशिएशनचे राज्य सचिव अमन चौधरी यांनी दिली .

नुकतीच या राज्य स्पर्धा आयोजनासंदर्भात पदाधिकाऱ्यांची बैठक आत्मामलिक शैक्षणिक संकुल कोकमठाण येथे संपन्न झाली . आत्मामलिक संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी यांनी या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेला संपूर्ण सहकार्य व सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले .

अहमदनगर जिल्हा सचिव संदीप घावटे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या बैठकीला क्रीडा शिक्षक महासंघाचे अध्यक्ष व खेलो मास्टर्सचे उपाध्यक्ष राजेंद्र कांतकर , राज्य सचिव अमन चौधरी , खजिनदार सुनिल हामंद , एस. पी . शर्मा , अजित पवार , सुरज शिंगोटे ,

शशेंद्र त्रिपाठी व विविध जिल्ह्यातून आलेले पदाधिकारी उपस्थित होते . खेलो मास्टर्स असोशिएशनचे अध्यक्ष आमदार क्षितीज ठाकूर , चेअरमन रामसिंग राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली खेलो मास्टर्स राज्यस्तरीय स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे ,

प्रत्येक जिल्ह्यातून जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी सचिव अमन चौधरी यांनी केले . स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी राजेंद्र कोतकर , सुनिल हामंद , संदीप घावटे यांनी यावेळी मौलिक मार्गदर्शन केले .

या स्पर्धेच्या माध्यमातून ३० , ३५ , ४० , ४५ , ५० , ५५ , ६० व त्यापुढील वयोगटातील पुरुष व महिलांसाठी ॲथलेटिक्स , कबड्डी , खो-खो , व्हॉलीबॉल , बास्केटबॉल ,फुटबॉल ,हॉकी , नेटबॉल ,स्विमिंग , टेबल टेनिस , बॅडमिंटन , कुस्ती , रायफल शूटिंग अशा १३ क्रीडाप्रकारांचा समावेश केला आहे .

यातील विजेत्या खेळाडूंना राष्ट्रीय स्पर्धा खेळण्याची संधी मिळणार आहे . क्रीडास्पर्धेत सहभागासाठी व अन्य माहितीसाठी राज्य सचिव अमन चौधरी – 9822637083 , राजेंद्र कोतकर -7709120121, संदीप घावटे-9767201269 , अजय पवार-8830862877यांच्याशी संपर्क करावा .

स्वतः च्या शालेय जीवनात जे खेळाडू स्पर्धात्मक खेळ खेळले . पण आता वाढत्या वयाबरोबर खेळ ,स्पर्धा भाग घेता येणे शक्य नाही अशा ३० वर्षापुढील खेळाडूंसाठी राज्यस्तरीय खेलो मास्टर्स स्पर्धा ही एक पर्वणीच आहे . पालकांनी देखील आनंद मिळवण्यासाठी यात सहभाग घ्यावा .

श्री .राजेंद्र कोतकर
अध्यक्ष , महाराष्ट्र राज्य क्रीडा शिक्षक महासंघ
उपाध्यक्ष , खेलो मास्टर्स असोशिएशन