मुंबई – महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ झाल्यानंतर अखेर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. आणि त्यांच्या राजीनाम्यानंतर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. तर, दुसरीकडे देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. त्यामुळे आता राज्यात शिंदे सरकार स्थापन झाले आहे.

दरम्यान, या राजकीय उलथापालथ झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आता संभाजी ब्रिगेड (Sambhaji Brigade) संघटनेशी युती केली आहे.

आगामी निवडणुकांमध्ये संभाजी ब्रिगेड (Sambhaji Brigade) या नवीन सहकाऱ्याला घेऊन आपण खांद्याला खांदा लावून लढणार आहोत, असं उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या या युतीवर राज्यातील अनेक नेत्यांनी आपली प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. भाजपा नेते निलेश यांनी देखील उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

निलेश राणेंनी (Nilesh Rane) उद्धव ठाकरे सैराट मित्रमंडळाशी देखील आता युती करतील, असा टोला लगावला आहे. निलेश राणेंनी यासंदर्भात एक ट्वीट करत उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं आहे.

“उद्धव ठाकरेंची अशी अवस्था झाली आङे की ते सैराट मित्र मंडळाशीही युती करतील” असं या ट्वीटमध्ये निलेश राणे (Nilesh Rane) म्हणाले आहेत.

तर दुसरीकडे मनसे कडून देखील या युतीवर टीका करण्यात आली आहे. मनसे आमदार राजू पाटील (raju patil) यांनी ट्वीट करत शिवसेनेला खोचक टोला लगावला आहे.

“सत्तेविना मती गेली, जो मिळेल त्याच्याशी युती केली…’, असं ट्वीट करून राजू पाटील यांनी शिवसेनेला खोचक टोला लगावला आहे.