Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

तरुणाचे अपहरण करून कोयत्याने वार !

भावाच्या खुनाप्रकरणी तरुणाच्या मित्राचा हात असल्याच्या संशयातून सराइताने साथीदारांच्या मदतीने तरुणाचे अपहरण करून त्याच्यावर कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना फुरसुंगीत घडली आहे.

या प्रकरणी सराईत सागर घायतडक, किरण शिंदे, नयन कोळेकर यांच्यासह १० ते १५ जणांविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ओंकार तुकाराम लोंढे (वय १८, रा. मांजरी) यांनी तक्रार दिली आहे. सराईत आरोपी सागर घायतडक याचा भाऊ अनिकेत घायतडक याचा काही दिवसांपूर्वी खून झाला आहे.

संबंधित खूनप्रकरणी फिर्यादी ओंकार लोंढे याचा मित्र बंटी तुपे आणि शुभम मोडक यांचा हात असल्याचा संशय सागरला होता. त्याचा राग मनामध्ये धरून आरोपींनी काल दुपारी अडीचच्या सुमारास ओंकारचे अपहरण केले. त्याला फुरसुंगी परिसरात नेऊन त्याच्यावर कोयत्याने वार केले. या प्रकरणी हडपसर पोलिस तपास करीत आहेत.

Leave a comment