किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर हल्ल्याप्रकरणी पुण्याच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात (Shivajinagar Police Station) सात ते आठ शिवसैनिकांनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कलम 143, 147, 149, 341, 336, 337 यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे महापालिका (Pune Municipal Corporation) परिसरात सोमय्या यांना काही शिवसैनिकांनी रोखण्याचा प्रयत्न केला.

यावेळी झालेल्या धक्काबुक्कीत किरीट सोमय्या महापालिकेच्या इमारतीच्या पायऱ्यांवर कोसळले. सदर घटनेचा सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडिओ (Video) देखील व्हायरल झाला आहे.

Advertisement

या घटनेत पुणे महापालिकेच्या इमारतीच्या पायऱ्यांवर कोसळल्याने सोमय्या यांच्या पाठीच्या कण्याला दुखापत झाली असून किरीट सोमय्या यांना पुण्यातील संचेती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

पुण्यातील संचेती हॉस्पिटलमधून सोमय्या यांना डिस्चार्ज मिळाला आहे. दुपारी ते निलम नगर मुलुंड येथे पोहोचणार आहेत. दरम्यान शिवसेनेचे पुणे शहराध्यक्ष संजय मोरे (Sanjay More) आणि त्याची काही साथीदार सोमय्या यांना निवेदन देण्यासाठी गेले होते.

यावेळी त्यांनी निवेदन न स्वीकारल्यामुळे सोमय्या यांना शिवसैनिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. यामध्ये काही शिवसैनिक सोमय्या यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसून येत आहे. तर काहीजण कारसमोर आडवे पडून सोमय्या यांची गाडी रोखण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहेत.

Advertisement