पुणे : भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर पुण्यामध्ये (Pune) शिवसैनिकांनी धक्काबुक्की केली होती. याच पार्श्वभूमीवर आज पुन्हा ते पुणे दौऱ्यावर आहेत. या ठिकाणी भाजपकडून त्यांचा सत्कार करून त्यांची मनधारणा केली जाणार आहे.

किरीट सोमय्या यांचा भाजपकडून (BJP) पुण्यामध्ये सत्कार केला जाईल, मात्र या सत्काराला काँग्रेसचा (Congress) विरोध आहे.

तसेच काँग्रेसकडून या ठिकाणी निदर्शने घडू नये म्हणून पुणे महापालिकेच्या आवारात पुणे पोलिसांच्या (Pune Police) वतीने चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Advertisement

या ठिकाणी पुणे महापालिका परिसरात मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त लावण्यात येणार आहे. दुपारी 4 वाजता किरीट सोमय्यांचा भाजपकडून सत्कार करण्यात येणार आहे. पुणे पोलिसांकडून मात्र चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

दरम्यान भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) हे मागील आठवड्यात पुणे (Pune) दौऱ्यावरती असताना पुण्यात शिवसैनिकांनी त्यांची अडवणूक करून त्यांना धक्काबुक्की केली.

या घटनेचा भाजपकडून निषेध केला होता. तसेच या प्रकारात चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी किरीट सोमय्या यांना ठार मारण्याचा हेतू असल्याचा असा गंभीर आरोप शिवसेनेवर केला होता.

Advertisement

किरीट सोमय्या हे पुणे येथे आले असता शिवसैनिकांकडून त्यांची अडवणूक करण्यात आली होती. या गोंधळात किरीट सोमय्या हे पायऱ्यांवरुन पडले होते. यावेळी त्यांच्या पाठीच्या मणक्याला दुखापत झाली होती.