पुणे : भाजपचे (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर ते पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात निवेदन देण्यासाठी गेले आता त्यांना शिवसैनिकांकडून धक्काबुक्की करण्यात आली होती.

या धक्काबुक्कीमध्ये किरीट सोमय्या खाली पडले होते. यांनतर ८ शिवसैनिकांवर गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. किरीट सोमय्या यांनी सेनेचे शहरप्रमुख संजय मोरे (Sanjay More) यांच्यासह आठ जणांविरुद्ध दिली तक्रार दिली आहे.

शिवसेना पुणे शहरप्रमुख संजय मोरे, किरण साळी यांच्यासह आठ शिवसैनिक स्वतः मंगळवारी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivajinagar Police Station)  हजार राहणार असल्याची माहिती मिळत आहे.

Advertisement

किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले, महानगरपालिकेत शिवसेने केलेल्या धक्काबुक्कीत फारशी शारीरिक इजा झाली नाही.

पुणे महानगरपालिकेचे कर्मचारी व शिवसेना हायकमांडने मिळून रीतसर कट रचत ही मारहाण केल्याचे समोर आले आहे. यामध्ये किरीट सोमय्या दोन, तीन महिने उठला नाही पाहिजे असा मार देण्याचा कट होता असा आरोप सोमय्यांनी केला आहे.

अमिताभ गुप्ता हे तेच पोलीस आयुक्त आहेत. ज्यांनी राकेश वाधवानला पळवून लावले होते. सगळे व्हिडीओ पाहिल्यानंतर आणि सीआयएसएफच्या अहवालतही पुणे पोलीस, महापालिकेतील सुरक्षा कर्मचारी आणि शिवसेना हायकमांडने मिळून रितसर कट रचला असल्याचे समोर आले आहे असेही सोमय्या म्हणाले.

Advertisement