मुंबई : भाजपचे (BJP) माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर घोटाळा केल्याचे आरोप केले आहेत. तेव्हापासून भाजप आणि शिवसेनेमध्ये वाकयुद्ध सुरु झाले आहे.

आजही किरीट सोमय्या यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

तसेच अनिल देशमुखांच्या शेजारील खोली उद्धव ठाकरेंना सॅनिटाईज करावी लागेल असा इशाराही किरीट सोमय्या यांनी दिला आहे.

Advertisement

किरीट सोमय्या म्हणाले की, माझे वय ६९ आहे. पण मित्र म्हणतात की मी ४२ चा वाटतो. आणि मला ४२ चाच राहायचे आहे.

वाढदिवसापेक्षा मला काळजी कोव्हिड सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्यांची आहे. पण उद्धव ठाकरे यांनी कंत्राट चायवाल्याला दिले.

घोटाळ्यात हे सगळे पार्टनर आहेत. म्हणून एकमेकांना वाचवण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. कोव्हिडमध्ये अनेकांचे कायमचे नुकसान झाले.

Advertisement

त्याला वाचवण्यासाठी काँग्रेस इतक्या खालच्या पायरीवर जाऊ शकते. त्यांना माझा नमस्कार, असे सांगतानाच प्रविण राऊतांपासून इतरांनी ईडीला जी माहिती दिली आहे.

त्यावरून अनिल परब आणि संजय राऊत यांना लवकरच जेलमध्ये जावे लागणार आहे. मुख्यमंत्र्यांनी या दोघांसाठी अनिल देशमुखांबाजूच्या खोल्या सॅनिटाईज करून घ्याव्यात, असेही सोमय्या म्हणाले आहेत.

चायवाला, दारुवाला हे उद्धव ठाकरेंचे कारनामे आहेत. वाईन कंपनीसाठी पॉलिसी बदलली गेली. संजय राऊत पार्टनर बनले. जी कंपनी अस्तित्वात नाही त्यांना कंत्राट दिले.

Advertisement

एका चहावाल्याला कंत्राट दिले. कोविड कंपनी कधी स्थापन झाली नाही त्यांना कंत्राट कसे दिले गेले? असा प्रश्नही किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, संजय राऊत सांगतात की डेकोरेटरचा डोक्यावर बंदूक ठेवली. आम्ही विषय काढला नाही. किती कार्यकर्म झाले? कुठे झाले? किती खर्च झाला? त्याचा हिशोब द्या.

पेमेंट तुम्ही केला की बेनामी चायवाल्याने ते सांगा की बीआर शेट्टीने केला? की प्रविण राऊतचा कंपनीने केला. कुटुंबाच्या कार्यक्रमात आम्ही पडत नाही., पण तुम्ही मोदी सरकारवर आरोप केले आता हिशोब द्या, असेही सोमय्या म्हणाले आहेत.

Advertisement