Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

राष्ट्रवादीच्या ‘या’ मंत्र्यावर किरीट सोमय्यांचे आरोप

शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची व आमदारांची ईडी चाैकशी सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर माहिती अधिकार कार्यकर्त्याच्या माध्यमातून दोनशे कोटी रुपये वसुली केल्याचा आरोप माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे.

अनेक नेत्यांवर सीबीआय, ईडीची टांगती तलवार

राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या अनेक नेतेमंडळींवर सध्या ईडी किंवा सीबीआयची टांगती तलवार आहे.

Advertisement

अनिल देशमुख, एकनाथ खडसे, प्रताप सरनाईक या नेत्यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे, तर अनिल परब, मिलिंद नार्वेकर यांसारख्या नेत्यांविरोधात सोमय्या यांनी पदाचा गैरवापर करून स्वत:ची मालमत्ता उभी केल्याचे आरोप केले आहेत. आता सोमय्या यांनी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.

आरोप काय?

“जितेंद्र आव्हाड यांनी पहिल्या टाळेबंदीच्या काळात सारं काही बंद असताना सामाजिक कार्यकर्ता प्रवीण कलमे याच्या मदतीने वसुलीचा धंदा मांडला.

एसआरए, म्हाडा अशा विविध ठिकाणी कलमे याने आव्हाडांसाठी वसुली केली असून तो आव्हाडांचा सचिन वाझे आहे”, असा खळबळजनक आरोप सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत केला.

Advertisement

81 अर्जाची माहिती देण्याचा आदेश वादात

६ जुलै २०२० या दिवशी माहिती अधिकारात आलेल्या ८१ अर्जांचे उत्तर द्या असा आव्हाडांचा आदेश होता. त्यादिवशी संपूर्ण मुंबईत शंभर टक्के टाळेबंदी होती.

झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प (एसआरए) कार्यालयात १५ टक्के उपस्थिती होती. आव्हाडदेखील कोरोनामधून काही दिवसांपूर्वीच बरे होऊन बाहेर आले होते.

कोरोनामधून बरे झाल्यावर लगेचच त्यांनी प्रवीण कलमे याच्या मार्फत एका दिवसात केलेल्या ८१ एसआरए प्रकल्पांची संपूर्ण माहिती मागितली.

Advertisement

कलमेसोबत बैठक घेण्याचे आदेश

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामध्ये कलमे यांच्यासोबत ताबडतोब संयुक्त बैठक घ्या आणि अर्जदार कलमे यांच्यासोबत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणच्या अभियंतासह संयुक्त पाहणी व भेट द्या.

तसेच एसआरए नियम अंतर्गत १ जानेवारी २००५ पासून मंजूर करण्यात आलेल्या सर्व प्रकल्पांची माहिती द्या, असे आदेश दिले.

गृहनिर्माण मंत्र्यांच्या आदेशाप्रमाणे एसआरएने रोडवे 2 प्रमाणे 31 प्रकल्पाची संयुक्त पाहणी करण्याचे वेळापत्रक बनवले व अनेक ठिकाणी संयुक्त पाहणीही केली.

Advertisement

या गोष्टीचा मंत्र्यांच्या कार्यालयातून नियमित पाठपुरावा केला जात होता. या संबंधीची सगळी माहिती मिळाल्यानंतर ताबडतोब आव्हाड यांनी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.

Leave a comment