पुणे : भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना पुण्यात (Pune) शिवसैनिकांनी धक्काबुक्की केल्यांनतर भाजपचे नेते चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. किरीट सोमय्या यांनी आज पत्रकार परिषद (Press Conference) घेतली त्यामध्ये त्यांनी संजय राऊत (Sanjay Raut) आणि ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.

किरीट सोमय्या हे आज पुण्यात आले होते. यावेळी त्यांनी महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Muralidhar Mohol) यांची भेट घेतली. तसेच त्यांनी लाईफलाईन कंपनीविरोधात घोटाळ्याचा आरोपांवरुन चर्चा केली आहे.

किरीट सोमय्या, माझा आवाज दाबण्यासाठी, आपल्या वरील आरोप उघड होऊ नये, यासाठी माझ्यावर भ्याड हल्ला करण्यात आल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांच्यावर केला आहे.

Advertisement

‘तुटून पडा.. हात तोडा, पाय तोडा, जीव गेला तरी चालेल, पण किरीटला गप्प बसवा’, असे आदेश मातोश्रीवरुन येत असल्याचा आरोप देखील किरीट सोमय्या यांनी केला आहे.

पण किरीट सोमय्यांवर महाराष्ट्राच्या (Maharashtra) जनतेचा आशीर्वाद आहे. त्याचा आवाज कधीच बंद होणार नाही असा इशाराही किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिला आहे.

जी कंपनी अस्तित्वातच नाही अशा कंपनीला एकूण १३ कंत्राटे दिल्याचा आरोप, सोमय्यांनी केलाय. शंभर कोटींची काम दिल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केलाय. राऊतांना राऊतांचीच भीती वाटत आहे असेही सोमय्या म्हणाले आहेत.

Advertisement

इतकेच काय तर अनिल देशमुखांच्या (Anil Deshmukh) शेजारच्या दोन कोठड्या सॅनिटाईज करुन ठेवा, असा इशाराही संजय राऊत यांना किरीट सोमय्या यांनी दिला आहे. .

उद्धव ठाकरेंच्या उद्धट सरकारला धडा शिकवल्याशिवाय शांत बसणार नाही, परळच्या हॉस्पिटलच्या बाहेर तो चहाची किटली विकणारा कोण आहे, हे सांगा ना? असे म्हणत किरीट सोमय्यांनी राऊतांना चिमटा काढला आहे.

Advertisement