मुंबई : शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सोमय्या वेडा झाला आहे. त्यांना स्वप्नातही बंगले दिसतात अशी टीका केली होती. त्यानंतर आता किरीट सोमय्या (Kirit somaiya) यांनी संजय राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.

संजय राऊत आणि किरीट सोमय्या यांच्यातील आरोप करण्याचे सत्र काही केल्या संपत नसल्याचे दिसत आहे. किरीट सोमय्या आज कोर्लई गावात गेले आहेत. त्यावेळी त्यांनी राऊतांवर पलटवार केला आहे.

किरीट सोमय्या म्हणाले, होय, आहे मी ध्येयवेडा. सरकारचे घोटाळे बाहेर काढण्यासाठी आणि राज्यातील साडेबारा कोटी जनतेच्या हितासाठी ध्येयवेडा व्हावे लागले तर होईल ध्येयवेडा अशा शब्दात राऊतांना किरीट सोमय्यांनी उत्तर दिले आहे.

Advertisement

कोर्लई (Korlai) गावात जाण्यापूर्वी त्यांनी भाजप (BJP MLA) आमदार रवी पाटील (Ravi Patil)यांच्या पेणमधील घरी उतरले. रवी पाटील यांच्या घरी उतरल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

पुढे बोलताना किरीट सोमय्या म्हणाले, मी ठाकरे सरकारच्या १८ नेत्यांचे घोटाळे बाहेर काढले. शिवसेनेच्या खासदार भावना गवळीचा पार्टनर जेलमध्ये गेलाय. आनंद अडसूळांच्या नावाने वॉरंट आहे.

अनिल परब यांचा रिसोर्ट बेकायदेशीर ठरला असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार आहे. प्रताप सरनाईक खोटं बोलत होते. त्यांना सरकारने टॅक्स माफ केला आहे.

Advertisement

हसन मुश्रीफांच्या जावयाच्या बेनामी कंपनीला दिलेले १५०० कोटीचे दिलेले कंत्राट रद्द झाले आहे. अनिल देशमुख आत आहेत. म्हणजे मी जे बोलत होतो ते सिद्ध होत आहे.

वेडे झाल्याशिवाय हे काम होत नाही. मी जर ध्येयवेडा असेल तर साडेबारा कोटी जनतेसाठी ध्येयवेडा व्हायला तयार आहे, असे म्हणत संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.

Advertisement