पुणे : भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना पुणे महानगपालिकेत धक्काबुक्की करण्यात आली होती. त्यांनतर राज्यात चांगलेच वातावरण तापले होते. किरीट सोमय्यांनी मुख्यमंत्री कार्यालयावर (Chief Minister’s Office) गंभीर आरोप केले आहेत.

किरीट सोमय्यांना धक्काबुक्की झाल्यानंतर ते पायरीवरून पडून त्यांच्या हाताला आणि पाठीच्या मणक्याला दुखापत झाली आहे. त्यांनतर भाजपने शिवसेनेवर (Shivsena) आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर कडाडून टीका केली होती.

भाजपकडून किरीट सोमय्यांचा त्याच पायऱ्यांवर सत्कार केला जाईल असे सांगण्यात आले होते. त्यानंतर किरीट सोमय्यांना आज पुण्यात येण्याचे आमंत्रण देऊन सत्कारासाठी पुण्यात बोलावले होते.

Advertisement

पुणे (Pune)  विमानतळावर किरीट सोमय्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, “महाराष्ट्राच्या (Maharashtra)  जनतेने लोकांच्या जीवाशी खेळण्याचा ठेका उद्धव ठाकरेंना दिला आहे का?

उद्धव ठाकरे यांनी संजय राऊतांच्या मदतीने कोविडमध्ये लोकांच्या जीवाशी खेळण्याचं पाप केले असून कारवाई झाली पाहिजे.

मी आज पुन्हा एकदा पोलीस, महापालिका यांना आग्रह करणार आहे की, घोटाळा करणारी कंपनी हेल्थकेअर लाइफलाइन यांच्यावर कारवाई करा”.

Advertisement

“गेल्यावेळी मुख्यमंत्री कार्यालयाने १०० गुंड पाठवले आणि तक्रार होऊ दिली नाही. कारवाई कशी होत नाही, पाहतोच, असे म्हणत किरीट सोमय्या यांनी शिवसेनेला इशारा दिला आहे.

“संजय राऊतांना एवढी मस्ती, गुर्मी आहे की मी लोकांचा जीव घेणार. बोगस कंपन्याकंडून कंत्राट घेणार, महाराष्ट्रातील लोकांची हत्या होऊ देणार आणि त्यानंतर काही होणार नाही असं वाटत असेल तर ते मूर्ख आहेत.

अनिल देशमुख जेलमध्ये गेलेत. संजय राऊतांचे मित्र, परिवार, पार्टनर यांच्यावर कारवाई होणारच,” असेही किरीट सोमय्यांनी सांगितले आहे.

Advertisement