मुंबई : शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माध्यमांशी बोलताना जे उखडायचे ते उखडा असे वक्तव्य केले होते. त्यानंतर राऊतांच्या या वक्तव्याचा किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) चांगलाच समाचार घेतला आहे.

संजय राऊत यांनी उद्या शिवसेना भवनात (Shivsena Bhawan) पत्रकार परिषद (Press Conference) घेणार असल्याचेही सांगितले आहे. तसेच किरीट सोमय्यांच्या आरोपांना उत्तर देण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.

संजय राऊत यांच्या याच वक्तव्यावरून किरीट सोमय्या यांना विचारण्यात आले असता ते म्हणाले, जे उखडायचे उखडा संजय राऊतांच्य वक्तव्यावर कानाला हात लावत ही भाषा आमच्या तोंडी शोभतं नाही, असं किरीट सोमय्या म्हणाले.

Advertisement

संजय राऊत विषयाला बगल देतायेत, आम्ही विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर संजय राऊतांना द्यावेच लागेल. मी मागे हटणार नाही माझी बांधिलकी जनतेशी आहे असेही किरीट सोमय्या म्हणाले आहेत.

विषय कुठे नेताय ? उत्तर द्या ! जम्बो कोव्हीड सेंटरमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची उत्तर द्या ! मृत्यू नाहीत तर लोकांचे खून झालेत असाही आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

अनिल परबांचा (Anil Parab) रिसॉर्ट (Resort) तोडलाच पाहिजे, त्यासाठी जिल्हाधिकारी , जिल्हा अधीक्षकांकडे तक्रार करणार आहे. अनिल परबांवर कारवाई झाली पाहिजे.केंद्र सरकारने आदेश दिलेत तोडक कारवाई कधी करणार? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

Advertisement