पुणे : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) हे पुन्हा सत्कारासाठी पुणे (Pune) या ठिकाणी आले होते. मात्र यावेळी पोलीस (Police) बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात होता. व रस्ते बंद केल्याने नागरिकांचे चांगलेच हाल झाले आहेत.

सोमय्या यांच्या सत्कारानिमित्त भाजपने (BJP) महापालिकेत शक्‍तीप्रदर्शन केले. त्या निमित्ताने शुक्रवारी सकाळपासूनच महापालिकेत कडक पोलीस बंदोबस्त होता. शिवाय, नेहमीचे सुरक्षा रक्षकही होते. त्यामुळे या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना प्रवेश दिला जात नव्हता.

या ठिकाणी शहरी गरीब योजनेअंतर्गत महापालिकेचे पत्र घेण्यासाठी अनेक नागरिक आले होते. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव कामकाज बंद ठेवले होते, त्यामुळे पोलिसांनी त्यांना बाहेरच थांबवले.

Advertisement

त्यानंतर सोमय्या साडेपाचच्या सुमारास महापालिकेबाहेर (Muncipal Corporation) गेल्यानंतर नागरिकांना आत सोडण्यात आले. मात्र, कामकाजाची वेळ संपल्याने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी नागरिकांना उद्या या असे सांगून तेथून पळ काढला होता.

सोमय्या येणार म्हणून शासकीय कामकाज बंद ठेवण्याच्या कोणत्याही सूचना प्रशासनाने न देता सर्वसामान्य लोकांचा विनाकारण वेळ वाया घालवला आहे. यामुळे नागरिकांना चांगलाच मनस्ताप झाला आहे.

तसेच सोमय्या येणार म्हणून पोलिसांकडून महापालिकेसमोरील रस्ता वाहतुकीसाठी बंद केला होता. तसेच, टिळकपूल कॉंग्रेस भवनाकडून आलेल्या वाहनांना या रस्त्याने येण्यास बंदी होती.

Advertisement

नवीन इमारतीसमोर पीएमपीचा बस थांबा असल्याने आणि मोकळ्या जागेत भाजप पदाधिकाऱ्यांनी वाहने पार्क केल्याने वाहतूक कोंडी झाली होती.

शिवाजी रस्त्यावर (Shiivaji Road) पालिका भवनासमोर भाजप कार्यकर्ते ढोल-ताशे घेऊन जमलेले असल्याने सोमय्या आल्यानंतर पोलिसांनाही जवळपास १५ ते २० मिनिटे शिवाजी रस्ताही बंद करावा लागला. त्यामुळे शिवाजीनगर भागात कोंडी झाली होती.या सर्व प्रकारामुळे पुणेकरांचे प्रचंड हाल झाले आहेत.

Advertisement