पुणे : भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आज पुन्हा पुणे (Pune) दौऱ्यावर असतानाच मागील आठवड्यात त्यांच्यासोबत झालेल्या धक्काबुक्की प्रकरणासंबंधी दोन पोलीस (Police) कर्मचारी निलंबित केले आहेत.

किरीट सोमय्या हे शनिवारी पुणे महानगरपालिकेत (Pune Municipal Corporation) आले होते. यावेळी शिवसेनेचे काही पदाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी पुढे आले.

परंतु यातूनच त्यांच्यात वाद झाला आणि त्याचे रूपांतर धक्काबुक्की झाले. या सर्व झटापटीत किरीट सोमय्या पायर्‍यांवरुन खाली कोसळले आणि त्यांना जबर दुखापत झाली होती. याप्रकरणी ६० ते ७० शिवसैनिकांनी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

Advertisement

या प्रकरणात चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील हल्ल्याचे सर्व पुरावे समोर असताना कोणतीही कारवाई होत नाही. त्यामुळे भविष्यात सर्व हिशोब चुकते होणार, असे पुण्यात ते पत्रकारांशी बोलताना सांगितले होते.

तसेच या हल्लाप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Union Home Minister Amit Shah) यांना पत्र लिहून सर्व पुरावे देणार असल्याचेही चंद्रकांत पाटील (Chandrakant patil) म्हणाले आहेत.

किरीट सोमय्या हल्ला प्रकरणाचे सर्व पुरावे उपलब्ध आहेत. पण तरीही पुणे पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद न करणे ,यातून पुणे पोलिसांवर दबाव असल्याचे दिसुन येत आहे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले होते.

Advertisement

त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून सदर माहिती कळवली असून, सर्व पुरावे दिले आहेत. तसेच या प्रकरणी लक्ष घालण्याची विनंती केली होती.

त्याचबरोबर “किरीट सोमय्यांवरील हल्ल्याच्या पाठिमागे कोण आहे, ते सर्वांना माहीत आहे. ज्यांची नावे हळूहळू समोर येत आहेत, त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.

कोणत्याही क्षणी तपास यंत्रणा त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे त्यावर उत्तर देता येऊ शकत नसेल, तेव्हा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतो. पण त्यांनी कितीही प्रयत्न केले, तरी आमचा आवाज दाबू शकत नाहीत,” असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले होते.

Advertisement